04 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाडीच्या ताफ्यातील एका गाडीला आज (बुधवारी) दुपारी दिल्लीत एका टाटा सुमोने धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मोहन भागवत सुखरुप असून आपल्या नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास दुपारी मोहन भागवत आपल्या ताफ्यासह जात असताना भरधाव वेगाने आलेल्या टाटा सुमोने भागवत यांच्या ताफ्यातील एका गाडीला धडक दिली. दिल्लीत विमानतळाकडे जाताना कॅन्टोन्मेंटमधील परेड रोडजवळ हा अपघात झाला. टाटा सुमोच्या ड्रायवरला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, दिल्लीत अशाचं एका कार अपघातात काल (मंगळवारी) भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
Follow @ibnlokmattv |
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा