तेलंगणा जन्मले, के. चंद्रशेखर राव पहिले मुख्यमंत्री

तेलंगणा जन्मले, के. चंद्रशेखर राव पहिले मुख्यमंत्री

 • Share this:

telangana jalosj

2 जून : गेल्या 60 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न, देशातलं 29वं राज्य म्हणून स्वतंत्र तेलंगणा राज्य मध्यरात्री अस्तित्वात आलं आला आहे. सव्वाआठच्या सुमारास तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव उर्फ केसीआर यांनी शपथ घेतली. त्यापूर्वी सकाळी साडेसहा वाजताच संयुक्त आंध्र प्रदेशचे राज्यपाल ESL नरसिम्हन यांनी तेलंगणाच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. याचबरोबर तेलंगणा राज्यात राष्ट्रपती राजवट हटवण्याची घोषणाही केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे करण्यात आली.

 स्वतंत्र तेलंगणाचा हैदराबादसह तेलंगाणातल्या लाखो नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं. हैदराबादच्या चारमिनारसह ऐतिहासिक इमारती, सचिवालय असलेल्या नेकलेस रोडवर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. रात्री 12 वाजता तेलंगणा राज्याचा जन्म होताच ठिकठिकाणी ध्वजारोहण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तेलंगणासाठी बलिदान करणार्‍या शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहीद स्मारकावर नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून तेलंगणावासियांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले...

"भारताला नवीन राज्य मिळालं! आम्ही 29वं राज्य म्हणून तेलंगणाचं स्वागत करतो. येत्या काही वर्षांमध्ये तेलंगणा देशाच्या विकासामध्ये भर घालेल. या लढ्यातील शहीदांना वंदन करतो. तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार्‍या के. चंद्रशेखर राव यांचं अभिनंदन. माझ्या तेलंगणावासियांना हार्दिक शुभेच्छा."

कोण आहेत के . चंद्रशेखर राव?

 • तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उर्फ केसीआर
 • आधी काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते
 • आंध्र प्रदेशचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं
 • 2001 साली टीडीपीच्या आमदारकीचा राजीनामा
 • स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाची स्थापना केली
 • यूपीए - 1मध्ये केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री होते
 • 2006 मध्ये दिला मंत्रीपदाचा राजीनामा
 • 2009 साली स्वतंत्र तेलंगणासाठी बेमुदत उपोषण
 • या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसला 119 पैकी

स्वतंत्र तेलंगणा राज्याचा संघर्ष जवळपास 55 वर्षांचा आहे. एक नजर टाकूया तेलंगणाच्या इतिहासावर

 • 1960 मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
 • तेलंगणातल्या लोकांना दुजाभाव मिळतो म्हणून केलेलं आंदोलन
 • 1969 साली तेलंगणा प्रजा समिती पक्षाची स्थापना
 • 1990 मध्ये भाजपकडून तेलंगणा राज्य निर्मितीचं आश्वासन
 • 2001 साली के चंद्रशेखर राव यांच्यातर्फे तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना
 • 2006 साली राव यांनी आंध्र राज्य सरकार आणि यूपीएला दिलेला पाठिंबा काढून घेतला
 • स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी काढून घेतला पाठिंबा
 • केंद्रीय मंत्रीपदाचा केसीआर यांच्याकडून राजीनामा
 • नोव्हेंबर 2009 मध्ये केसीआर यांचं स्वतंत्र तेलंगणासाठी आमरण उपोषण
 • डिसेंबर 2009 मध्ये तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांनी दिलं आश्वासन
 • स्वतंत्र तेलंगणा निर्मिती प्रक्रिया लवकरच सुरु करण्याचं आश्वासन
 • फेब्रुवारी 2010 मध्ये श्रीकृष्ण समितीची स्थापना
 • जुलै 2011 मध्ये तेलंगणाच्या 100 आमदार आणि 13 खासदारांनी दिला राजीनामा
 • सप्टेंबर 2012 मध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा स्वतंत्र तलंगणासाठी उत्स्फूर्त संप
 • जुलै 2013 मध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीकडून स्वतंत्र तेलंगणाची घोषणा
 • फेब्रुवारी 2014 मध्ये स्वतंत्र तेलंगणा विधेयकाला संसदेची मंजुरी
 • मे 2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टीआरएसला बहुमत
 • 2 जून 2014 स्वतंत्र तेलंगणाचा जन्म आणि केसीआर यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी

First published: June 2, 2014, 10:33 AM IST

ताज्या बातम्या