'त्या' पाचही विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांना सेवेत घ्या -स्मृती इराणी

  • Share this:

23smrutiirani31 मे : केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या वादाला कारणीभूत ठरणार्‍या दिल्ली विद्यापीठाच्या पाच कर्मचार्‍यांच्या बाबत खुद्द स्मृती इराणी यांनी सहानुभूती दाखवली आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या निलंबित केलेल्या 5 कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्यात यावं असं आवाहन स्मृती इराणी यांनी केलं आहे. स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती अनधिकृतपणे जाहीर केल्याबद्दल दिल्ली विद्यापीठाच्या 5 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलं होतं.

स्मृती इराणी यांनी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत बीए पदवी आणि बी कॉम पदवी असा उल्लेख केला होता. या प्रकरणी काँग्रेसने इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा उचलून धरला होता. पण स्मृती इराणी यांची माहिती लिक कशी झाली याचा पहिला संशय विद्यापीठावर घेण्यात आला.

चौकशीच्या अंतर्गत पाच जणांनी ही माहिती अनधिकृतपणे दिली असल्याचं स्पष्ट झालं यामुळे पाच जणांना तातडीने निलंबित करण्यात आलं. मी एक नागरिक म्हणून ही विनंती करतेय की त्या पाचही जणांना पुन्हा सेवेत घ्या अशी मागणी स्मृती इराणी यांनी केली.

First published: May 31, 2014, 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading