काँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळात फेरबदल, 4 मंत्र्यांना डच्चू ?

काँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळात फेरबदल, 4 मंत्र्यांना डच्चू ?

  • Share this:

5656sonia_cm30 मे : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ काँग्रेसही राज्य मंत्रिमंडळात बदल करणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याच संदर्भात आज (शुक्रवारी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. भेटीनंतर सूत्रांनी आयबीएन लोकमतला ही माहिती दिलीय. काँग्रेसच्या 2 ते 4 मंत्र्यांना वगळलं जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातल्या तीन रिकाम्या जागाही भरल्या जाणार असल्याचं कळतंय. मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

 

दोनच दिवसांपूर्वी राज्यपाल नियुक्त सहा आमदारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी संभाव्य नाावांविषयी प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काही नाव चर्चेत आली आहेत. मात्र काँग्रेसकडून माजी मंत्र्यांचं पूनर्वसन करण्याची हालचाल सुरू आहे.

 

तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं सोपवण्यात आलंय. विजयकुमार गावित यांची हकालपट्टीनंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागी आव्हाडांना नियुक्त करण्यात आलंय. आता काँग्रेसकडून कोणत्या मंत्र्यांची वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2014 04:44 PM IST

ताज्या बातम्या