S M L

'टीम मोदी लागली कामाला', काळा पैशांच्या प्रकरणी एसआयटी स्थापन

Sachin Salve | Updated On: May 28, 2014 04:13 PM IST

'टीम मोदी लागली कामाला', काळा पैशांच्या प्रकरणी एसआयटी स्थापन

27 मे : 'फस्ट डे फस्ट शो' दाखवत मोदी सरकार कामाला लागले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला काळ्या पैशांचा मुद्या मोदी सरकारने हाती घेतला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आज पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काळ्या पैशांच्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. एसआयटीच्या सदस्यांची घोषणाही करण्यात आली आहे. कायदामंत्री  रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली.

काळा पैसा देशात परत आला पाहिजे ही आमची प्राथमिकत्ता आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत एकमुखाने याला मंजुरी देण्यात आली. एसआयटीचे अध्यक्ष जस्टीस एम.बी.शाह असतील तर उपाध्यक्ष अरजीत पसायत असणार असल्याचं रविशंकर यांनी सांगितलं. एसआयटीमध्ये आरबीआयचे गर्व्हनर, रॉचे संचालक, आईबी, सीबीआआय, डीआरआईचे मुख्य सदस्य असणार आहे.


तसंच सोमवारी उत्तरप्रदेशमध्ये गोरखपूर एक्स्प्रेस अपघात प्रकरणी रेल्वेच्या सुरक्षेसाठी उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आलीय. तसंच संसदेचं अधिवेशन कधी सुरू होणार यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस नेते अजय माकन यांनी स्मृती इराणी या 12 वी पास असून त्यांना केंद्रीय मंत्रीपद का दिले अशी बोचरी टीका केली होती. माकन यांची टीका दुर्देवी असून इराणी यांनी या अगोदर राज्यसभेत आपलं काम यशस्वीपणे बजावलं म्हणून मोदींनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे असं उत्तर रविशंकर यांनी दिलं.

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2014 08:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close