नरेंद्र मोदींनी स्वीकारला पंतप्रधानपदाचा कार्यभार

नरेंद्र मोदींनी स्वीकारला पंतप्रधानपदाचा कार्यभार

  • Share this:

366pmnarnendra_modi27 मे : राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला आहेत. आज सकाळी 8.50 च्या सुमारास मोदी पंतप्रधान कार्यालयात 'बीएमडब्यू कार'ने पोहचले.

पंतप्रधान कार्यालयाच्या कर्मचार्‍यांनी मोदींचं स्वागत केलं. कार्यालयात दाखल झाल्यानंतर मोदी महात्मा गांधी यांच्या स्मृतीस फूलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी सार्क नेत्यांची भेट घेणार आहे.

सकाळी 09.30 वाजेच्या सुमारास अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांची ते पहिली भेट घेणार आहे. त्यानंतर मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे, भूतानचे पंतप्रधान ल्याँचेन त्शेरिंग, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांची भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी 12.10 वाजेच्या सुमारास पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेणार आहे.

मोदींचा शपथविधी

सोमवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात भव्य अशा दिमखादार सोहळ्यात नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काल 45 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 24 कॅबिनेट मंत्री, 10 स्वतंत्र प्रभार आणि 11 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासह 24 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर राजनाथ सिंह त्यानंतर सुषमा स्वराज आणि मग अरुण जेटली यांनी शपथ घेतली. स्वतंत्र कार्यभार असणारे 10 राज्यमंत्री आणि 11 राज्यमंत्र्यांचाही यावेळी शपथविधी झाला. तर महाराष्ट्रातल्या सहा खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अनंत गीते यांना कॅबिनेट मंत्रिपद तर रावसाहेब दानवे, पियुष गोयल यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलंय. प्रकाश जावडेकरांना स्वतंत्र कारभार पद देण्यात आलंय.

नरेंद्र मोदींचा देशवासीयांना पहिला संदेश

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर बदल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संदेश दिलाय.

"सगळे एकत्र येऊन सशक्त, विकसित आणि सर्व समावेशक भारताचं स्वप्न पाहूया. हा भारत जागतिक पातळीवर शांतता आणि विकासासाठी इतर देशांसोबत काम करू शकेल. जगातल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी माझा तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या ताकदीवर ठाम विश्वास आहे. हे व्यासपीठ ऐकण्यासाठी, शिकण्यासाठी आणि मतं मांडण्यासाठी संधी देईल अशी माझी आशा आहे असा संदेश त्यांनी दिला."

सार्क नेत्यांची उपस्थिती

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी सार्क नेत्यांनी उपस्थिती लावली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यासह मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला, मालदिवचे पंतप्रधान अब्दुल्ला यामीन हेसुद्धा उपस्थित होते. देशाच्या इतिहासातला हा खरोखरच एक महत्त्वाचा क्षण होता. सार्क नेत्यांच्या उपस्थितीच्या माध्यमातून जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

असा आहे पंतप्रधानांचा आजचा दिवस

  • सकाळी 09.30 - अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई
  • सकाळी 10.05 - मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन
  • सकाळी 10.30 - श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे
  • सकाळी 10.55 - भूतानचे पंतप्रधान ल्याँचेन त्शेरिंग
  • सकाळी 11.20 - मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम
  • सकाळी 11.45 - नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला
  • दुपारी 12.10 - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ
  • दुपारी 12.45 - बांग्लादेश संसदेच्या अध्यक्ष शिरीन शर्मिन चौधरी

First published: May 27, 2014, 8:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading