अशी आहे टीम मोदी !

अशी आहे टीम मोदी !

 • Share this:

434team_modi26 मे :नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात रंगलेल्या अभूतपूर्व अशा सोहळ्यात देशाच्या 15 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. उद्या सकाळी ते पंतप्रधानपदाचा कारभार स्वीकारतील. त्यांच्यासोबत 45 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 24 कॅबिनेट मंत्री, 10 स्वतंत्र प्रभार आणि 11 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

आज मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासह 24 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर राजनाथ सिंह त्यानंतर सुषमा स्वराज आणि मग अरुण जेटली यांनी शपथ घेतली. स्वतंत्र कार्यभार असणारे 10 राज्यमंत्री आणि 11 राज्यमंत्र्यांचाही यावेळी शपथविधी झाला. भाजपकडून अजून खातेवाटप जाहीर करण्यात आलं नाही.

पण राजनाथ सिंह यांच्याकडे गृहमंत्री, अरुण जेटलींकडे अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री, सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र खातं, नितीन गडकरी यांच्याकडे दळणवळण आणि जहाजबांधणी मंत्री, गोपीनाथ मुंडे ग्रामविकास मंत्री, उमा भारती यांच्याकडे जलसंपदा आणि गंगा स्वच्छता, स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकासमंत्री तर रामविलास पासवान यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद सोपवण्याची शक्यता आहे.

कॅबिनेट मंत्रिपद (सर्व शक्यता)

 • राजनाथ सिंह - गृहमंत्री
 • अरुण जेटली - अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री
 • सुषमा स्वराज - परराष्ट्र खातं
 • नितीन गडकरी - दळणवळण आणि जहाजबांधणी मंत्री
 • गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
 • उमा भारती - जलसंपदा आणि गंगा स्वच्छता
 • नजमा हेपतुल्ला - अल्पसंख्यांक कल्याण
 • रामविलास पासवान - अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
 • व्यंकय्या नायडू - नागरी विकासमंत्री
 • कलराज मिश्र - लघु आणि मध्यम उद्योदमंत्री
 • मनेका गांधी - महिला आणि बालकल्याण
 • अनंत कुमार - संसदीय कामकाजमंत्री
 • रविशंकर प्रसाद - कायदेमंत्री आणि दूरसंचारमंत्री
 • सदानंद गौडा - रेल्वमंत्री
 • स्मृती इराणी - मनुष्यबळ विकासमंत्री
 • डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य
 • जुआल ओराम - आदिवासी कल्याण मंत्री
 • राधा मोहन सिंग - कृषी खातं
 • अशोक गजापती राजू - नागरी उड्डाण मंत्रीपद

मोदी मंत्रिमंडळात महिलाराज

 • सुषमा स्वराज, कॅबिनेट मंत्री - परराष्ट्र मंत्री
 • नजमा हेपतुल्ला, कॅबिनेट मंत्री - अल्पसंख्याक मंत्री
 • उमा भारती, कॅबिनेट मंत्री - जलसंपदा आणि गंगा स्वच्छता मंत्री
 • स्मृती इराणी, कॅबिनेट मंत्री - मनुष्यबळ विकास मंत्री
 • हरसिम्रत कौर, कॅबिनेट मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री
 • मनेका गांधी - कॅबिनेट मंत्री - बालविकास मंत्री
 • निर्मला सीतारामन, राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) - वाणिज्य मंत्रालय राज्यमंत्री

मोदींच्या या मंत्रिमंडळाची वयानुसार वैशिष्ट्यं

 • पन्नाशीपेक्षा लहान मंत्री - 7
 • पन्नाशीपेक्षा लहान कॅबिनेट मंत्री - 2
 • सत्तरीतले कॅबिनेट मंत्री - 2
 • साठीतले कॅबिनेट मंत्री - 12
 • मोदींच्या कॅबिनेटचं सरासरी वय - 60
 • स्मृती इराणी - वय 38 - सर्वात तरुण मंत्री
 • नजमा हेपतुल्ला - वय 74 - सर्वात ज्येष्ठ मंत्री

मोदी मंत्रिमंडळाची वैशिष्ट्यं काय आहे ?

 • - राज्यांच्या प्रतिनिधित्वावर भर नाही; 25 खासदार असूनही राजस्थानमधून एकही मंत्री नाही
 • - मित्रपक्षांवर फारसे अवलंबून नाही; प्रत्येक मित्रपक्षाला फक्त एक कॅबिनेट मंत्रिपद
 • - महिलांना भरघोस प्रतिनिधित्व; 24 पैकी 6 कॅबिनेट मंत्रिपदं महिलांकडे
 • - मोदींच्या विश्वासातल्या आणि मेहनती, तरुणांना प्राधान्य; उदा. स्मृती इराणी, निर्मला सीतारामन
 • - घराणेशाहीला स्थान नाही; दुष्यंत राजे, जयंत सिन्हा, अभिषेक सिंह यांना मंत्रिपद नाकारलं
 • - भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या येडियुरप्पांसारख्या दिग्गजांना स्थान नाही
 • - सत्तरीच्या पुढच्या मुरली मनोहर जोशी, अडवाणींसारख्या नेत्यांना मंत्रिमंडळातून टाळलं

 

First published: May 26, 2014, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading