मोदी इफेक्ट: पाकिस्तान- श्रीलंकेतील मच्छीमारांची होणार सुटका

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 25, 2014 06:36 PM IST

मोदी इफेक्ट: पाकिस्तान- श्रीलंकेतील मच्छीमारांची होणार सुटका

modi sharief and

25 मे :  नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत बंदी असलेल्या सर्व मच्छीमारांची सुटका करा, असे आदेश श्रीलंकेचं अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी दिले आहेत. राजपक्षे उद्या होणार्‍या शपथविधीला हजर राहणार आहेत. मच्छिमारांना सोडण्यामागे केवळ सदिच्छा हाच हेतू असल्याचं राजपक्षेंनी आपल्या ट्विटमध्ये सष्ट केलं आहे. नेमके किती भारतीय मच्छीमार श्रीलंकेत बंदी आहेत हे श्रीलंकेचे अधिकारी सांगू शकले नाहीत.

तर दुसरीकडे, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि आण्णा द्रमुकच्या अध्यक्ष जे. जयललिता नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सोहळ्याला उपस्थित राहणार नाही आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना मोदींनी शपथविधीचं निमंत्रण दिलं आणि राजपक्षेंनी ते स्वीकारलं असल्यामुळे जयललिता नाराज आहेत. श्रीलंकेत तामिळ लोकांवर झालेल्या अत्याचारांच्या आरोपांमुळे तामिळनाडूतले बहुतांश नेते श्रीलंकेशी संबंध ठेवण्यासाठी राजी नाही आहेत. याच पार्श्वभूमीवर राजपक्षेंच्या भेटीविरोधात काही विद्यार्थी आज चेन्नईत आंदोलन करत आहेत तर केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडीही मोदींच्या शपथविधीला हजर राहणार नसल्याचे समजते.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये बंदी असलेल्या भारतीय मच्छीमारांपैकी 153 मच्छीमारांना सोडण्यात येणार अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कालच केली आहेत.  निवडणुकीच्या काळात भाजपने 'अच्छे दिन आने वाले हैं अशी जाहिरात चालवालेली, पण सध्येची परिस्थीती पाहाता मच्छीमारांसाठी अच्छे दिन आगये हैं असं म्हणावं लागेल.

दरम्यान, मोदींनीही याबद्दल ट्विट केलं आहे. तसंच श्रीलंका आणि पाकिस्तानमधल्या भारतीय मच्छिमारांना सोडण्याबाबत आनंद व्यक्त करणारं ट्विटही त्यांनी केलं आहे.

Loading...

उद्या मी माझा दिवस राज घाटावर जाऊन आणि पूज्य बापूजींना आदरांजली वाहून सुरू करणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्ताननं आपल्या मच्छीमारांना सोडण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचं मी स्वागत करतो. मी आपल्या मच्छीमार बांधवाचं स्वागत करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2014 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...