S M L

'टीम मोदी'मध्ये राजनाथांना गृह तर जेटलींना अर्थ खातं मिळण्याची शक्यता

Sachin Salve | Updated On: May 23, 2014 11:10 PM IST

'टीम मोदी'मध्ये राजनाथांना गृह तर जेटलींना अर्थ खातं मिळण्याची शक्यता

23 मे : भाजपचे नेते नरेंद्र मोदी सोमवारी 26 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. पण मोदींचं मंत्रिमंडळ कसं असेल याबाबत सगळीकडेच उत्सुकता आहे. आपलं मंत्रिमंडळ छोटं असण्यावर मोदींचा भर असेल असं समजतंय. भाजपचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर जे.पी.नद्दा यांच्याकडे भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा जाऊ शकते. मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांची संख्या कमी आणि राज्यमंत्र्यांची संख्या जास्त असल्याची शक्यता आहे. मोदींच्या संभाव्य मंत्रिमंडळात राजनाथ सिंह यांच्याकडे गृह खातं सोपवण्याची शक्यता आहे. तर भाजपमध्ये दाखल झालेले माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्यांना संरक्षण राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर अरुण जेटली यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या अर्थात अर्थखातं दिलं जाईल.

सुषमा स्वराज यांच्याकडे गृह, परराष्ट्र ,अर्थ किंवा संरक्षण या 4 महत्त्वाच्या खात्यांपैकी एक खातं दिलं जाईल. तर मुरली मनोहर जोशी यांच्याकडे गृह, परराष्ट्र, अर्थ किंवा संरक्षण या 4 महत्त्वाच्या खात्यांपैकी एक खातं दिलं जाईल अशी शक्यता आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींना ऊर्जा खातं मिळेल आणि भाजपसोबत हातमिळवणी करणारे लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष राम विलास पासवान यांच्याकडे आरोग्य किंवा कृषी खातं मिळण्याची शक्यता आहे.


संभाव्य खातेवाटप

  • राजनाथ सिंह- गृह खातं
  • Loading...

  • माजी लष्करप्रमुख - व्ही.के.सिंग- संरक्षण राज्यमंत्रीपद
  • अरूण जेटली- अर्थखातं
  • सुषमा स्वराज- गृह, परराष्ट्र ,अर्थ किंवा संरक्षण या 4 महत्त्वाच्या खात्यांपैकी एक
  • मुरली मनोहर जोशी- गृह, परराष्ट्र, अर्थ किंवा संरक्षण या 4 महत्त्वाच्या खात्यांपैकी एक
  • नितीन गडकरी- ऊर्जा खातं
  • लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष राम विलास पासवान- आरोग्य किंवा कृषी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2014 08:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close