मोदींच्या शपथविधीला लतादीदी,बिग बी,रजनीकांत,सलमान आमंत्रित !

मोदींच्या शपथविधीला लतादीदी,बिग बी,रजनीकांत,सलमान आमंत्रित !

 • Share this:

8989modi_oath_23 मे : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम एकहाती जिंकल्यानंतर भाजपचे नेते नरेंद्र मोदी सोमवारी 26 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला जगभरातील मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलंय.

यामध्ये बॉलिवडूचे दिग्गज स्टारही हजेरी लावणार आहे. भारतरत्न आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री रेखा, सुपरस्टार रजनीकांत, शहेनशाह अमिताभ बच्चन आणि दंबग अर्था सलमान खान शपथविधीला उपस्थित असणार आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही हजेरी लावणार आहे.

या शपथविधीला 3 हजार मान्यवर येणार असल्यामुळे मोजक्याच मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलंय. मोदींचे पाहुण्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला, मालदीवचे राष्ट्रपती अब्दूल गयूम अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हामिद करजाई उपस्थित राहणार आहे.

तर राज्यातून राजकीय पाहुणे म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिुंह हुडा जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई, बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी, केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी, सरसंघचालक मोहन भागवत भाजपचे सर्व प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहे.

मोदींच्या शपथविधीला कोण कोण येणार ?

 परदेशी आमंत्रित

 • - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ
 • - श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे
 • - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना
 • - अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई
 • - नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला
 • - मालदीवचे अध्यक्ष अब्दूल गयूम

राजकीय आमंत्रित

 • - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
 • - प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
 • - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता
 • - हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा
 • - जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला
 • - आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई
 • - बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी
 • - केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी
 • - सरसंघचालक मोहन भागवत
 • - भाजपचे सर्व प्रदेशाध्यक्ष

सेलिब्रिटी आमंत्रित

- रजनीकांत

- लता मंगेशकर

- रेखा

- सलमान खान

- सचिन तेंडुलकर

- अमिताभ बच्चन

 

First published: May 23, 2014, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading