मोदींच्या शपथविधीला जयललितांची अनुपस्थित?

मोदींच्या शपथविधीला जयललितांची अनुपस्थित?

  • Share this:

Narendra Modi with Jayalalith 2

22 मे : भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी म्हणजेचं 26 मे राजी होण्यार्‍या शपथविधी आधीच रुसवेफुगवे सुरू झाले आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके (AIADMK)च्या अध्यक्ष जयललिता मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दांडी मारण्याची शक्यताय वर्तवली जात आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना शपथविधीला निमंत्रण दिल्यामुळे जयललिता नाराज झल्याचे समजते. तर दुसरीकडे एमडीए(NDA)चा घटक असलेला एमडीएमके (MDMK) या पक्षाचे अध्यक्ष वायकोही याच कारणीने नाराज असल्याचे समजते. त्यांनी मोदींना पत्र लिहून आपला विरोध नोंदवला आहे.

श्रीलंकेत तामिळ लोकांच्या हत्याकांडाचा आणि भारतीय मच्छिमारांच्या प्रश्नाचा मोदींनी विचार करावा, असं वायको यांनी या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद कारझाई या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यताय. तर अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल आज कायमच्या अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत.

First published: May 22, 2014, 9:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading