मोदींच्या शपथविधीला कोण कोण येणार? पाकच्या पंतप्रधानांनाही आमंत्रण

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 21, 2014 11:54 PM IST

nmodimarried100414e

21 मे : भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीसाठी सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवलंय. यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचाही समावेश आहे. पण, ते स्वत: या सोहळ्याला येणार नाहीत तर आपला प्रतिनिधी पाठवणार आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी मात्र मोदींचं निमंत्रण स्वीकारलंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन जपान दौर्‍यावर जात आहेत. त्यामुळे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री शहरयार आलम, संसदेचे सभापती डॉ.शिरीन चौधरी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. परराष्ट्र धोरण बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत, असंच एकंदर यावरून जाणवतंय.

साऊथ ब्लॉकला आता परराष्ट्र मंत्र्यांची प्रतीक्षा आहे. पण नरेंद्र मोदी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वाचे बदल घडवण्याचे संकेत दिलेत. मोदींनी सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलंय. यामध्ये पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचाही समावेश आहे. पण ते या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. पण या निमंत्रणावरून चर्चेला सुरुवात झालीय.

नव्या सरकारसमोर पाकिस्तानकडून सुरक्षेला असलेल्या धोक्याचे आव्हान कायम आहे. त्यामुळे मोदी सरकारला कठोर आणि नरमाईचं धोरण, यात समतोल साधावा लागणार आहे.

मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून यूके, जपान आणि रशियाच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत. पण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिका भेटीच्या दिलेल्या निमंत्रणाला मोदींनी दिलेला प्रतिसाद फारसा सकारात्मक दिसला नाही. मोदींनी ओबामांना उत्तर द्यायला जवळजवळ 48 तास वेळ घेतला. यानंतरच्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात, "बराक ओबामा आणि मी भारत आणि अमेरिका यांचे धोरणात्मक संबंध अधिक दृढ व्हावेत, ज्यामुळे दोन्ही देशांना मदत होईल या दृष्टीने चर्चा केली."

Loading...

संयुक्त राष्ट्रच्या परिषदेसाठी मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे. पण ते व्हाईट हाऊसचं निमंत्रण कधी स्वीकारतील, याबद्दल नेमकं काहीच सांगता येत नाही, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

 मोदींचा परराष्ट्र दौरा

- ब्राझीलमध्ये जुलै महिन्यात ब्रिक राष्ट्रांची होणारी परिषद म्हणजे मोदींची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद असेल.

- तर पहिला परराष्ट्र दौरा हा जपानचा असेल. यातून चीनला सूचक संकेत देण्याचा मोदींचा मानस असल्याचं म्हटलं जातंय.

परराष्ट्र राजकारण हे अर्थकारणावर अवलंबून असतं. त्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांबद्दलचा निर्णय लवकरच होईल पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी धोरणात्मक निर्णय घेतील, असं तज्ज्ञांना वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2014 11:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...