...अन् नरेंद्र मोदींना अश्रू अनावर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 20, 2014 05:10 PM IST

...अन् नरेंद्र मोदींना अश्रू अनावर

56narendra_modi_Cry20 मे : भाजप माझी आई आहे आणि आईची सेवा ही कधी तिच्यावर केलेली कृपा असते का ? अस म्हणत नरेंद्र मोदींना अश्रू अनावर झाले. आज (मंगळवारी) भाजपच्या संसदीय समितीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली. यावेळी मोदींचं संसदेत नेतेपद स्वीकारताना मोदी तसंच लालकृष्ण अडवाणी भावूक झाले.

मोदींनी आमच्यावर कृपा केली म्हणून त्यांच्यामुळे आज हे दिवस पाहण्यास मिळाले असं सांगत अडवाणी भावूक झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी आपल्या आईवर कोणी कृपा, उपकार करत नसतो' भाजप माझ्यासाठी आई आहे मी जे केलं ते माझ्या आईसाठी केलं असं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले.

यावेळी सेंटर हॉलमध्येही सर्व नेते स्तब्ध झाले होते. त्यापुर्वी आज सकाळी 11 च्या सुमारास एनडीएचे सर्व नेते, पदाधिकारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले. मोदी 11 वाजून 50 मिनिटांनी गुजरात भवनातून संसदेत पोहोचले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मोदी संसदेच्या पायर्‍यांवर नतमस्तक झाले.

त्यानंतर भाजपच्या संसदीय समितीच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवडीची घोषणा करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ष अडवाणी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला भाजपच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन दिलं. अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, मुरली मनोहर जोशी, रविशंकर प्रसाद, व्यंकय्या नायडू आणि इतर नेत्यांनी मोदींच्या नावाच्या प्रस्तवाला अनुमोदन दिलं. यानंतर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालं अशी घोषणा केली.

 

Loading...

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून सक्षम आहेत असं सागत राजनाथ म्हणाले की 'येस ही विल' हे म्हणून त्यांनी बराक ओबामांच्या प्रचाराचं घोष वाक्य 'येस वी कॅन'ची आठवण करून दिली. या घोषणेनंतर मोदींचं अभिनंदन करताना लालकृष्ण अडवाणी भावूक झाले. मी आज जेव्हा मोदींना भेटलो, तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं, असं अडवाणी म्हणाले. यानंतर, नरेंद्र मोदींनी भाषण केलं. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणीनी भावूक झाले. आज जर वाजपेयी इथं असते, तर सोन्याहून पिवळं झालं असतं अशी आठवण मोदींनी काढली. त्यानंतर, अडवाणींबाबत बोलताना पुन्हा मोदी भावुक झाले. अडवाणीजी, आपण म्हणालात की मोदींनी कृपा केली. आईची सेवा ही कधी तिच्यावर केलेली कृपा असते का, असं म्हणत मोदी भावूक झाले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2014 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...