गंगामातेनंच मला तुमचं बनवलंय -मोदी

गंगामातेनंच मला तुमचं बनवलंय -मोदी

  • Share this:

nmodimarried100414e

17 मे : भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा आज कौतुकाचा दिवस होता. दिल्लीत जंगी स्वागत झाल्यानंतर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी वाराणसीत आले. त्यांनी गंगेच्या काठी दशाश्वमेध घाटावर गंगापूजा केली.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. गंगा आरतीच्या आधी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. गंगा आरतीनंतर त्यांनी गंगाघाटावर जमलेल्या लोकांशी संवाद साधला.मोदींनी वाराणसीतल्या मतदारांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी वाराणसीवासियांना गंगा स्वच्छ करण्याचं आश्वासन दिलंय.

तसंच वाराणसीला आध्यात्मिक राजधानी बनवण्याचंही आश्वासन दिलंय. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शाहसुद्धा यावेळी उपस्थित होते. राजनाथ सिंग सर्वात चांगले अध्यक्ष आहे असं कौतुकही मोदींनी केलं. त्या आधी सकाळी दिल्लीत भव्य रॅली निघाली. मोदी दिल्ली विमानतळावर येणार या अगोदरच विमानतळाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मोदींचं आगमन होता 'मोदी...मोदी...' च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर एअरपोर्टपासून मोदींच्या गाड्यांचा भला मोठा ताफा निघाला.

यावेळी दोन्ही बाजूंचे रस्ते लोकांनी भरून गेले होते. मोदींच्या कारवर फुलांची उधळण होत होती. ही जंगी मिरवणूक भाजपच्या मुख्यालयापर्यंत पोहोचली. तिथं अगोदरच मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. भाजपच्या मुख्यालयाबाहेर भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मोदींचं जोरदार स्वागत केलं. यानंतर मोदींनी तिथंच एक छोटंसं भाषण केलं. त्यानंतर मोदी संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी भाजपच्या मुख्यालयात गेले. तिथं सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि एकमेकांना पेढेही भरवले. मोदींनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा पायापडून आशीर्वाद घेतला. यानंतर मोदींनी मतदारांचे आभार मानले.

First published: May 17, 2014, 11:57 PM IST

ताज्या बातम्या