दिल्ली मोदींच्या घोषणांनी दणाणली, मोदींचं जंगी स्वागत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 17, 2014 04:54 PM IST

दिल्ली मोदींच्या घोषणांनी दणाणली, मोदींचं जंगी स्वागत

modi rally

17 मे : भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं आज (शनिवारी) दिल्लीत भव्य रॅली निघाली. मोदी दिल्ली विमानतळावर येणार या अगोदरच विमानतळाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मोदींचं आगमन होता 'मोदी...मोदी...' च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

त्यानंतर एअरपोर्टपासून मोदींच्या गाड्यांचा भला मोठा ताफा निघाला. यावेळी दोन्ही बाजूंचे रस्ते लोकांनी भरून गेले होते. मोदींच्या कारवर फुलांची उधळण होत होती. ही जंगी मिरवणूक भाजपच्या मुख्यालयापर्यंत पोहोचली. तिथं अगोदरच मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. भाजपच्या मुख्यालयाबाहेर भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मोदींचं जोरदार स्वागत केलं.

Loading...

यानंतर मोदींनी तिथंच एक छोटंसं भाषण केलं. त्यानंतर मोदी संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी भाजपच्या मुख्यालयात गेले. तिथं सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि एकमेकांना पेढेही भरवले. मोदींनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा पायापडून आशीर्वाद घेतला. यानंतर मोदींनी मतदारांचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2014 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...