वाराणसीतही मोदी जिंकले, केजरीवाल 'आप'टले !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 16, 2014 11:05 PM IST

वाराणसीतही मोदी जिंकले, केजरीवाल 'आप'टले !

878modivskejriwal16 मे : 'हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणं' तर काय होते हे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालंय. दिल्लीचे तख्त सोडून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले केजरीवाल चांगलेच तोंडावर 'आप'टले आहे. आम आदमी पक्षासाठी ही पहिली लोकसभा निवडणूक होती पण या निवडणुकीत 'आप'ला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही.

खुद्द अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत वाराणसीच्या आखाड्यात उतरले पण इथं मोदींनी त्यांना चांगलाच 'काशी'चा घाट दाखवला. वाराणसीतून नरेंद्र मोदी तब्बल 5 लाख 83 हजार मतांनी विजयी झाले. तर बडोद्यातूनही मोदी 5 लाख मताधिक्यांनी विजयी झाले आहे. आपण निवडणूक जिंकणार असा नाहक विश्वास बाळगणारे केजरीवाल पराभूत झाले. केजरीवाल यांना इथं 2 लाख 70 हजार मतं मिळाली.

तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय तिसर्‍या स्थानावर फेकले गेले. तर दिल्ली विधानसभेत घवघवीत यश मिळवणार्‍या आपला दिल्लीमध्ये खातंही खोलता आलं नाही. फक्त पंजाबमध्ये 'आप'ला फक्त 4 जागा मिळाल्या. महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाला फारच कमी प्रतिसाद मिळाला. राज्यात जवळपास सगळेच उमेदवार पराभूत झाले.

Loading...

अमेठीमध्ये कुमार विश्वास, नागपूरमध्ये अंजली दमानिया, मुंबई मयांक गांधी, मेधा पाटकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. दिल्लीमध्ये आम्ही अजून चांगलं काम करू शकलो असतो. त्याबद्दल आम्ही निराश झालो. भाजपनं मिळवलेल्या यशाबद्दल मी मोदींचं अभिनंदन करतो असं आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हंटलंय. तर आम्ही लोकांना आमचं काय चुकलं याबद्दल विचारू, असं 'आप'चे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2014 11:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...