'सबका साथ, सबका विकास' हाच आमचा संकल्प -मोदी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 16, 2014 08:21 PM IST

'सबका साथ, सबका विकास' हाच आमचा संकल्प -मोदी

fg98modi_win_speech

16 मे : 'अब अच्छे दिन आये है' असं सांगत भाजपचे विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे मनापासून आभार मानले. विजयानंतर गुजरातच्या बडोद्यामध्ये नरेंद्र मोदींची विजयी सभा पार पडली. या सभेत मोदींनी 'सबका साथ, सबका विकास' असा नारा दिला. बडोद्यातून नरेंद्र मोदी विक्रमी मताने विजयी झाले. एवढेच नाहीतर गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागा भाजपने पटकावल्या आहे.

लोकांनी दाखवलेल्या विश्वासाने आपणं भारावून गेलोय. त्यामुळे मी इथं धन्यवाद म्हणण्यासाठी आलोय असं सांगत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. या निवडणुकीत बडोद्यात प्रत्येक जण मोदी बनला होता. इथलं मतदान हे ऐतिहासिक होतं, मतदारांनी काँग्रेसच्या जागाही भाजपला दिल्या. देशाने भाजपला त्रिशतकी जागा मिळवून दिल्या आहेत, भारतीय लोकशाहीत या विजयाने इतिहास रचला आहे असं सांगत मोदींनी देशवासियांचे मनापासून आभार मानले.

तसंच सरकार हे एका पक्षाचं नसतं, मी देशातल्या प्रत्येकासाठी काम करेन. मी देशवासियांच्या स्वप्नासाठी कष्ट करायला तयार असून माझ्यासारखा कष्ट करणारा मजूर तुम्हाला शोधूनही सापडणार नाहीआयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी खर्च करेन आता मी बडोद्याचा राहिलेलो नाही, तुम्हीच मला देशाचं बनवून टाकलंय असंही मोदी म्हणाले.

मोदींनी आपल्या भाषणात सयाजीराव गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही उल्लेख करत माझ्यासाठी राज्यघटना महत्त्वाची आहे म्हणून 'सबका साथ, सबका विकास' असंच आमचं ध्येय असेल असं मोदींनी जाहीर केलं. देशाच्या विकासासाठी सर्वपक्षीयांचं सहकार्य अपेक्षित आहे, तरच या देशाचा विकास होऊ शकतो. लोकशाहीमध्ये शत्रू नसतात तर स्पर्धक असतात त्यामुळे माझं कुणाशी शत्रुत्व नाही. प्रचाराच्या वेळी राजकीय विश्लेषकांनी आमच्या सरकार बद्दल भीती व्यक्त केली पण लोकांनी हे सरकार निवडून दिलं असे गौरवउद्गारही मोदींनी काढले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2014 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...