एक्झिट पोलची चिंता नाही -सोनिया गांधी

एक्झिट पोलची चिंता नाही -सोनिया गांधी

  • Share this:

345soniagandhi15 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता काही तास उरले आहे पण तीनच दिवसांपूर्वी सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केलाय. या पोलमध्ये 'अब की बार मोदी सरकार' येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. एनडीएला 250 च्यावर सर्वाधिक जागा मिळतील तर यूपीएला फार फार 102 जागा मिळतील असं भाकित वर्तवण्यात आलंय. एनडीएच्या नेत्यांनी एक्झिट पोलला निकालच समजून लगीनघाई सुरू केलीय. पण मी एक्झिट पोलची चिंता करत नाही, आम्ही 10 वर्षे चांगला कारभार केला आहे आम्हाला पोलची चिंता नाही असं मत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केलंय.

तसंच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चांगलं काम केलंय. त्यांच्या योगदानाचा आम्हाला अभिमान वाटतो असं कौतुकही सोनिया यांनी केलं. गेली दहा वर्ष देशाची सेवा केल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निरोप देण्यासाठी सोनिया गांधी यांनी बुधवारी निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं. पण या निरोप समारंभासाठी राहुल गांधी गैरहजर होते. ते परदेशात गेल्याचं सांगण्यात येतंय.

इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राहुल गांधी गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय. दरम्यान, या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या बाजूने निकाल लागला नाही तरी त्याचा दोष पंतप्रधानांना देऊ नये,असे आदेश सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिले आहेत. देश कठीण परिस्थितीत असताना यूपीए-1 आणि यूपीए-2 मध्ये मनमोहन सिंग यांनी अत्यंत चांगलं नेतृत्व केलं अशा शब्दांत त्यांचा काँग्रेस नेत्यांनी गौरव केलाय.

First published: May 15, 2014, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading