S M L

निकालाअगोदरच एनडीएला मिळाले दोन मित्र?

Sachin Salve | Updated On: May 14, 2014 07:44 PM IST

निकालाअगोदरच एनडीएला मिळाले दोन मित्र?

14 मे: लोकसभेच्या निकालानंतर पुढची रणनीती आखण्यासाठी भाजप नेत्यांच्या बैठका, गाठीभेटी सुरू असताना मित्र पक्ष जोडण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अशातच ओडिशातल्या सत्ताधारी बिजू जनता दलाचा एनडीएला पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे जयललीता यांचा पक्ष एआयएडीएमके ही एनडीएला पाठिंबा देऊ शकतो अशी शक्यता आहे.


ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या अटीवर एनडीएला पाठिंबा देता येईल असे संकेत बीजेडीच्या काही नेत्यांनी दिले आहेत. मात्र, एनडीएशी चर्चा करत नसल्याचं ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी स्पष्ट केलंय. भाजपमध्ये मोदीपर्वाची सुरुवात झाल्यानंतर काही मित्रपक्षांनी भाजपसोबत काडीमोड केला. पण भाजपला निकालात जास्त जागा मिळाल्या तर इतर पक्ष साथ देतील असा विश्वास भाजपने व्यक्त केलाय. याबाबतच नवीन पटनाईक आणि जयललीता यांनी सकारात्मक संकेत दिले आहे.

पटनायक यांचा पक्ष एनडीएमध्ये होता पण ते 2009 मध्ये एनडीएमधून बाहेर पडले. पण आता एनडीए सरकार येणार असल्याची शक्यता असल्यामुळे बिजू जनता दलानेही पाठिंब्या देण्याबाबत संकेत दिले आहे. याबद्दल आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून आम्ही काँग्रेस-भाजप असं अंतर राखून आहे असं पटनाईक यांनी सांगितलं.तर त्यांच्या पक्षाचे नेते प्रवत त्रिपाठी यांनी एनडीएला सशर्त पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय.

Loading...

तर जयललीतांच्या एआयईएडीएमकेने मोदी जर पंतप्रधान झाले तर पाठिंबा देण्यास कोणतीही अडचण नाही असं स्पष्ट केलंय. पार्टीचे नेते मलयसामी यांनी मोदी आणि जयललीता हे चांगले मित्र आहे जरीही त्यांच्या राजकीय मतभेद असले तरी एखाद्या निर्णयासाठी ते एकत्र येऊ शकता असं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2014 06:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close