S M L

सत्तास्थापनेसाठी भाजपची तयारी सुरू

Sachin Salve | Updated On: May 13, 2014 09:05 PM IST

Nitin Gadkari, Sushma Swaraj, Rajnath Singh, Lal Krishna Advani, Narendra Modi, Arun Jaitley13 मे : लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलं, पोस्ट पोल सर्व्हे आले आणि या सर्व्हेमध्ये भाजपप्रणित एनडीए बहुमत मिळवेल असं दाखवण्यात आलं. यानंतर आता भाजपच्या गोटात वेगाने घडामोडी घडायला सुरुवात झालीय.

भाजपचे वरिष्ठ नेते उद्या (बुधवारी) गांधीनगरमध्ये बैठक घेत आहेत. त्यासाठी हे नेते गुजरातमध्ये दाखलही झाले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, अरुण जेटली आणि नितीन गडकरी हे बैठकीला हजर असणार आहे.


त्यामुळे सरकार स्थापना आणि त्यानिमित्ताने पक्षसंघटनेत होणारे फेरबदल, याची चर्चा या बैठकीत होईल. दरम्यान, गडकरींनी सोमवारी नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आज सकाळी लालकृष्ण अडवाणी आणि दुपारी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमध्ये राजनाथ सामिल झाले तर भाजपचे अध्यक्ष गडकरी होतील, अशी चर्चा सुरू झालीय. गडकरी यांनी मात्र याचा इन्कार केलाय.

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2014 09:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close