मतदानादरम्यान तृणमूल आणि सीपीएमचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 12, 2014 02:00 PM IST

मतदानादरम्यान तृणमूल आणि सीपीएमचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

TMC Fights CPIM11 मे : पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदानाचा उत्साह कायम आहे पण पुन्हा हिंसाचाराचं गालबोटही लागलं आहे. सकाळी सातपासूनच याठिकाणी मतदानासाठी रांगाला लागल्या आहेत. हारुआ बशीरहाटमध्ये मतदान सुरु असताना तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय-एमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आह. यात 13 जण जखमी झाले आहेत.

हारुआ बशीरहाटमध्ये मतदान सुरु असताना तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असून, हाणामारी थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी मात्र आम्ही गोळीबार केला नसल्याचा दावा केला आहे. या हाणामारीत 13 जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधल्या बेहरामपूर इथं काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात हाणामारी झाली. त्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झालेत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2014 10:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...