राहुल गांधींनी केलं नियमांचं उल्लंघन?

राहुल गांधींनी केलं नियमांचं उल्लंघन?

  • Share this:

rahul gandhi08 मे :  काँग्रेसचे कार्यकर्ते मतदानकेंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काल आम आदमी पार्टीने केला होता. पण आता आणखीन एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. काल अमेठीमध्ये मतदान सुरु असताना राहुल गांधी मतदान केंद्रात इव्हीएम मशीनच्या जवळ गेले.

नियमांनुसार जर एखादा उमेदवार मतदार मत देत असताना जवळ गेला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात आपने निवडणूक आयोगाकडे बूथ कॅप्चरिंग आणि फेरफार केल्याची तक्रार दाखल केलेली आहे. पण निवडणूक आयोगाने आपचे आरोप फेटाळून लावला आहेत. तर राहुल गांधींनी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, कोणत्याही नियमांचं उल्लंघन न झाल्याचं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे भाजपच्या अमेठीतल्या स्मृती इराणी या काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या मतदान केंद्रावरच्या अधिकार्‍यांना धमकावत असल्याचा काल आरोप केला आहे. प्रियांका गांधी यांच्या पीए प्रीती सहाय्य अमेठीच्या रहिवासी नाही आहेत. तरीही त्या अजूनही अमेठीतच आहेत, असंही स्मृती इराणी यांनी लक्षात आणून दिलं. त्यानंतर जिल्हा रिटर्निंग अधिकार्‍यांनी प्रीती सहाय यांना अमेठी सोडून जायला सांगितलं.

दरम्यान, प्रियांका गांधींविरूध्द भाजपच्या नेत्यांनी दोन तक्रारी दाखल केल्यात. नीच राजनीती या प्रियांका गांधींच्या वक्तव्याबद्दल बिहारमध्ये या तक्रारी दाखल झाल्यात.

First published: May 8, 2014, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading