वाराणसीत भाजप कार्यकर्त्यांची दहशत - केजरीवाल

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2014 03:04 PM IST

Image img_225922_kejriwalondelhigangrape_240x180.jpg29 एप्रिल : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केलीे. वाराणसीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची दहशत असल्याचा आरोप त्यांनी केला. वाराणसीमध्ये काल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ही टीका केली.

वाराणसीत भाजप कार्यकर्त्यांची दहशत निर्माण केली आहे. लोकांनं मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांना मतदान तरी करता येईल की नाही याची चिंता वाटते तर वाराणसीला जास्त सुरक्षा पुरवण्याची गरज असल्याचं ही ते म्हणाले आहेत.

निवडणुकीच्या आधीच ही परिस्थिती असेल तर भाजप सत्तेवर आल्यावर भाजप देशाची काय स्थिती करेल याची कल्पना करवत नाही, असं केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं. या दोन्ही पक्षांची मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप त्यांनी केला. रॉबर्ट वडरा यांच्यावर भाजपचे नेते जमिनीच्या व्यवहारांवरून आरोप करतात, मग राजस्थानात भाजपचं सरकार असताना वडरा यांना अटक का केली जात नाही असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी मोदींच्या स्नूपगेट प्रकरणात काँग्रेसने मौन बाळगलं असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 02:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...