मोदींचे हवाला रॅकेट-अंडरवर्ल्डशी संबंध, काँग्रेसचा दावा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2014 11:01 PM IST

मोदींचे हवाला रॅकेट-अंडरवर्ल्डशी संबंध, काँग्रेसचा दावा

28april_narendra_modi_phatta_havala28 एप्रिल : काँग्रेस आणि भाजपमध्ये चिखलफेक युद्ध सुरूच आहे. भाजपने 'दामादगेट घोटाळा' जाहीर केला तर काँग्रेसने सडेतोड उत्तर देत नरेंद्र मोदींचे हवालाशी संबंध असल्याचा तोफगोळा डागला आहे.

नरेंद्र मोदींचे हवालाशी संबंध असून हवालाचा ऑपरेटर अफरोझ फट्टा हा मोदींचा कट्टर समर्थक आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय.

नरेंद्र मोदी आणि फट्टा यांचा एकत्रित फोटोही काँग्रेसने प्रसिद्ध केलाय. 700 कोटींच्या हवाला रॅकेटचा मार्ग हा सुरतच्या खासगी बँकेतून जात असल्याचे सुरजेवाला म्हणाले. तसंच या व्यवहारात अंडरवर्ल्डचा हात असल्याचा आरोपही काँग्रेसने केलाय. मोदींनी हवाला ऑपरेटरचं संरक्षण केलं असंही सुरजेवाला यांना दावा केलाय.

रणदीप सुरजेवाला यांचा मोदींवर आरोप

दिल्लीत नाही तर गुजरातच्या सूरतमध्ये एक हजार कोटींचा हवाला रॅकेट चालतोय. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. ज्याचे संबंध या चित्रांच्या माध्यमातून ज्याची मैत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत त्याचे धागेदोरे पोचले आहे. ज्याचा फोटो मुख्यमंत्री आणि भाजपनं आपल्या वेबसाईटवर लावलाय. स्वाभाविक आहे की, देशाच्या जनतेला हे जाणून घ्यायचंय की नरेंद्र मोदी आणि भाजपचा या हवाला रॅकेटशी काय संबंध आहे. हा पैसा कुणाचा होता. तो कुठे गेला आणि परत आला आणि तो कुणी वापरला. त्यांच्या डोळ्यांदेखत हवाला रॅकेट सुरू होतं, सोन्याची तस्करी होत होती. अंडरवर्ल्ड लिंकचे इंटरनॅशनल कॉल येत आहेत. अशावेळी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करत आहात? असा सवाल सुरजेवाला यांनी मोदींना विचारलाय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2014 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...