भाजपचे आरोप उतावळेपणातून :काँग्रेस

भाजपचे आरोप उतावळेपणातून :काँग्रेस

  • Share this:

56congress_bjp_vadera28 एप्रिल : मतदानाच्या तारखा जशाजसा जवळ येत आहे तशा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर चिखलफेक करण्यास कोणतही संधी दवडत नाहीय. भाजपने रविवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ड वडरांवर निशाणा साधत 'दामादगेट घोटाळा' जाहीर केला. त्याला काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.

भाजपने वडरांवर केलेले आरोप हे सत्तेसाठीच्या उतावळेपणातून केल्याचं सांगत काँग्रेसने वडरांवरचे हे भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. देशातल्या वेगवेगळ्या कोर्टांनी हे आरोप आधीच फेटाळून लावले असल्याचं काँग्रेसने आठवण करून दिली. सोनिया गांधींचे जावई असलेल्या रॉबर्ट वडरा यांच्या राजस्थान आणि हरियाणातल्या जागांच्या व्यवहाराविषयीचा व्हिडिओ भाजपने रविवारी प्रसिद्ध केला.

वडरा यांनी नियम डावलून जमिनी लाटल्या पण, काँग्रेस त्यांचा बचाव करत असल्याचंही भाजपनं म्हटलंय. भाजपच्या या आरोपांना प्रियांका गांधींना लगेच प्रत्युत्तर दिलं. भाजपची अवस्था ही घाबरून सैरावैरा पळणार्‍या उंदरासारखी झाली अशी बोचरी टीका प्रियांका गांधी यांनी केली. तर काहीही केलं तरी त्यांची सत्ता येणार नाही अशी टीकाही काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केलीय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2014 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...