S M L

राहुल गांधींबद्दलचं वादग्रस्त वक्तव्यं रामदेव बाबांना भोवलं, लखनौमध्ये प्रचारबंदी

Samruddha Bhambure | Updated On: Apr 27, 2014 06:28 PM IST

Image baba_ramdev_on_ajit_pawar_300x255.jpg27 एप्रिल : राहुल गांधींवर केलेली टीका रामदेव बाबांना महागात पडतलं आहे. काल त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर देशभरातल्या दलित संघटनांनी रामदेव बाबांवर हल्लाबोल केला आहे. तर लखनौ प्रशासनाने त्यांच्या सभांवर 16 मे पर्यंत बंदी घातली आहे.

रामदेव बाबांनी राहुल गांधींवर टीका करताना, 'राहुल गांधी दलितांच्या घरी पिकनिक आणि हनिमूनसाठी जातात' असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभर खळबळ उडाल्यानंतर त्यांनी अखेर शनिवारी माफी मागितली होती. तसेच त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात दोन ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. रामदेव बाबांच्या या वक्तव्यानंतर दलित वर्गामध्ये मोठी नाराजी पसरली असून दलित संघटनांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

बसप अध्यक्षा मायावती यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगानेही नियमांमध्ये काही बदल करत भाषण करताना  सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची जास्त काळजी घ्या अशी तंबी सर्व राजकीय पक्षांना दिली आहे.


बाबा रामदेवांच्या वक्तव्यानं दलितांची मनं दुखावली आहेत. त्यामुळे बाबा रामदेवांवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा आरपीआयनं निषेध केला आहे. एनडीए अथवा महायुतीला पाठिंबा देणार्‍यांनी अशी वक्तव्यं करू नयेत, असंही आठवलेंनी म्हटलं आहे.

 

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2014 03:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close