देश चालविण्यासाठी मोठ्या हृदयाची गरज असते- प्रियांका गांधी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2014 07:46 PM IST

Priyanka-Gandhi_027 एप्रिल : 'देश चालविण्यासाठी ५६ इंच छाती असण्याची गरज नसते, तर एका मोठ्या हृदयाची गरज असते,' अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

रायबरेली येथे आयोजित एका जाहीर सभेत प्रियांका म्हणाल्या, 'हा भारत देश आहे. या देशात तुम्हाला ५६ इंच छातीची गरज नसते. तुम्हाला मोठ्या मनाची गरज असते. तुम्हाला दुष्ट होण्याची गरज नसते.'

समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव यांनी उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या तुलना केली होती. 'यूपीचा गुजरात होऊ देणार नाही,' असे त्यांनी म्हटले होते. त्यावर 'उत्तर प्रदेशचा गुजरात करण्यासाठी ५६ इंचांची छाती असणे गरजेचे असते असे मोदी म्हणाले होते. मोदींच्या या वक्तव्यावरुन प्रियांका गांधींनी मोदींवर टीका केली.

देश चालवण्यासाठी बळाची आवश्यकता नसून नैतिक शक्तीची गरज आहे. आपल्या क्षमतेविषयी खोटे दावे करण्याची आवश्यकता नसून तुम्ही सक्षम असणे गरजेचे असते. देशाच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी बलिदान देण्याची तयारीही असायला हवी असे प्रियांका गांधींनी सांगितले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2014 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...