25 एप्रिल : निवडणूक प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान करणार्या भाजपच्या गिरीराज सिंग यांना पाटणा कोर्टाने जामीन मंजूर केला. मात्र, त्यांच्याविरोधात झारखंडमधल्या कोर्टानं काढलेलं अटक वॉरंट कायम आहे.
सिंह यांच्याविरोधात 21 एप्रिलला FIR दाखल करण्यात आला होता. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्यांनी पाकिस्तानात जावं असं वक्तव्य गिरीराज सिंह यांनी प्रचारादरम्यान केलं होतं. यानंतर सर्व स्तराच्या राजकीय पक्षांकडून सिंह यांच्यावर टीका होत होत्या.
Follow @ibnlokmattv |