'पुतळा जाळू नका तर...', गुजरातच्या दुर्योधनाचा भाऊ रावण काय म्हणतोय पाहा

'पुतळा जाळू नका तर...', गुजरातच्या दुर्योधनाचा भाऊ रावण काय म्हणतोय पाहा

गुजरातमधील हिरे व्यापाऱ्याने त्याच्या मुलांची नावे दुर्योधन आणि रावण अशी ठेवली आहेत. वास्तूशास्त्राच्या नियमांना धाब्यावर बसवून घरालादेखील मृत्यू असं नाव दिलं आहे.

  • Share this:

सूरत, 08 ऑक्टोबर : देशभरात दसरा उत्साहात साजरा केला जात आहेत. आज देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरेनुसार हा सण साजरा करतात. अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळण्याची परंपरा आहे. पण गुजरातमधील हिरे व्यापारी असलेल्या बाबू वघानी यांनी या सर्व अंधश्रद्धा आहेत असं म्हणत आपल्या मुलांना पौराणिक कथांमधील खलनायकांची नावं दिली आहेत. त्यांनी मोठ्या मुलाचं नाव रावण ठेवलं आहे. लोकांनी त्यावेळी आश्चर्य व्यक्त केलं पण वघानी यांनी मात्र यात काहीच वाईट नसल्याचं म्हटलं.

द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुर्योधनाचे नाव वघानी यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला दिलं आहे. फक्त मुलांची नावं अशी ठेवून वघानी थांबले नाहीत. त्यांनी घरातही वास्तूशास्त्राचे नियम धाब्यावर बसवले. घराचेही नाव त्यांनी मृत्यू असं ठेवलं आहे.

फक्त 8वी पर्यंत शिक्षण झालेलेय वघानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, अंधश्रद्धेला माझ्या जीवनात आजिबात स्थान नाही. मला लहानपणापासून माहिती आहे. शाळा सोडल्यानंतरही शिक्षणाची गोडी संपली नव्हती. त्यानंतर वघानी धार्मिक आणि इतर लेख, माहिती वाचत होते. त्यांनी लाओ-सू, कन्फ्यूशिअस, मूसा, शिंतो, मुहम्मद, जीजस, महावीर, बुद्ध हे सगळं वाचून काढलं. त्यांनी मुलांची नावं अशी ठेवली ज्यांचा उल्लेख फक्त वाइट अर्थानेच घेतलं जातो. मात्र तरीही वघानी यांना यात काहीच चुकीचं वाटत नाही.

दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळतात. त्याऐवजी धर्मासंबंधी असलेली अंधश्रद्धा जाळावी असं वघानी यांनी म्हटलं आहे. वघानी भावनगरमधील गरियाधर इथले असून 1965 पासून सूरतमध्ये राहतात. त्यांनी हिरे पॉलिश करण्यापासून सुरुवात केली होती. आता त्यांनी स्वत:चा व्यापार सुरू केला आहे. वघानी यांची मुलंही त्यांच्या या नव्या विचारांचा वारसा पुढं चालवत आहेत.

वघानी यांचा लहान मुलगा दुर्योधन याने सांगितलं की, मी आणि माझा भाऊ दोघेही विचित्र अशा नावांनी ओळखले जातो. मी माझा इमेल आणि इतर संपर्कासाठी दुर्योधन हेच नाव वापरतो. पण मित्रमंडळी हितेश नावानं हाक मारतात.

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: October 8, 2019, 1:56 PM IST
Tags: navratri

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading