'आप'च्या उमेदवार शाझिया इल्मी अडचणीत येण्याची शक्यता

'आप'च्या उमेदवार शाझिया इल्मी अडचणीत येण्याची शक्यता

  • Share this:

shazia with muslim23 एप्रिल : केजरीवाल यांच्या सहकारी शाझिया इल्मी या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आल्या आहेत. यंदाची निवडणूक म्हणजे नेत्यांनी तारतम्य सोडून विधानं करण्याचं व्यासपीठ बनली आहे. त्यामध्ये आता आम आदमी पक्षाच्या शाझिया इल्मींची भर पडली. 'सर्वाधिक धर्मनिरपेक्ष मुस्लीमच आहेत, त्यांना जातीयवादी व्हायला हवं', असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद येथीलआपच्या उमेदवार शाझिया इल्मी यांनी केले आहे.

शाझिया इल्मी असे वक्तव्य असणारा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर फिरतोत्यामुळे आपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इल्मी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस, भाजप या प्रमुख पक्षांसह आपच्या नेत्यांनीही टीका केली आहे.

या व्हिडिओमध्ये शाझिया इल्मी मुस्लीम नेत्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतनाची बातचीत रेकॉर्ड करण्यात आली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या आहेत, 'माझे मुस्लिमांना सांगणे आहे, की त्यांनी जास्त धर्मनिरपेक्ष बनू नये. त्यांना स्वतःच्या भल्यासाठी जातीयवादी बनावे लागेल. मला माहिती आहे, की हे वादग्रस्त वक्तव्य आहे. पण, सध्या हे गरजेचेही आहे. अरविंद केजरीवाल हे तुमचे आहेत. धर्मनिरपेक्षपणा मुस्लिमांसाठी खूप झाला. आपले नुकसान करणार्‍यांना तुम्ही आतापर्यंत निवडून देत आहात. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या घराकडे बघून जातीयवादी बनले पाहिजे.'

Loading...

दरम्यान, शाझिया यांचं वक्तव्य चुकीचं आहे, असं आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2014 09:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...