देशात काँग्रेसविरोधात भावना,राहुल गांधींची कबुली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2014 10:37 PM IST

देशात काँग्रेसविरोधात भावना,राहुल गांधींची कबुली

 etv_rahul_gandhi_interview22 एप्रिल : यूपीए सरकारकडून काही चुका झाल्या आहे, विरोधकांच्या मार्केटिंग चांगली आहे त्यामुळे देशात काँग्रेस सरकारविरोधी भावना आहे अशी कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी दिलीय. नेटवर्क 18च्या ईटीव्ही या चॅनलला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर आणि परखड मतं माडंलीय.

देशात काँग्रेसविरोधात भावना असल्याचं मान्य करत त्यांनी एनडीएपेक्षा यूपीएनं देशासाठी अधिक चांगलं काम केल्याचा दावाही राहुल गांधींनी केला. ही निवडणूक म्हणजे दोन वेगळ्या विचारसरणीतला लढा असल्याचं मतही राहुल यांनी नोंदवलं.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेसनं बरचं काम केलंय. पण भाजपसारखं मार्केटिंग आम्हाला जमत नाही पण विरोधक समाजात फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभेच्या अंतिम टप्प्यात प्रियांका गांधी प्रचार सभा घेत आहे. यावरून प्रियांका गांधी राजकरणात येणार का असा सवाल विचारला असता, राजकारणात येण्याचा निर्णय हा सर्वस्वी तिचाच आहे. याबद्दल ती जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहिलं असं उत्तर राहुल यांनी दिलं.

Loading...

भाजपने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलाय तर उद्या काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान पद स्वीकारणार्‍यासाठी आग्रह केला तर जबाबदारी सांभाळणार का असा सवाल विचारला असता राहुल म्हणाले, जर माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली तरी मला स्वीकारावी लागेल यासाठी मी 100 टक्के तयार आहे. त्यावेळी यंत्रणा बदलणारं सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसंच राहुल यांनी भाजपवरही हल्लाबोल केला.भाजप मार्केटिंग करण्यात हुशार आहे. पण विरोधकांनी काहीही दावे केले तरी काँग्रेसने गेल्या दहा वर्षात चांगले काम केले आहे. मोदींवर आपण व्यक्तीगत टीका केली नाही कारण आमचे असे संस्कार नाही असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2014 10:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...