समलिंगी संबंधाच्या निर्णयावर होणार पुन्हा सुनावणी

समलिंगी संबंधाच्या निर्णयावर होणार पुन्हा सुनावणी

  • Share this:

act 37722 एप्रिल : समलिंगी संबंध कलम 377 साठी लढणार्‍या कार्यकर्त्यांना कोर्टाने काही प्रमाणात दिलासा दिलाय. याबद्दलच्या सुधारित याचिकेवर सुनावणी करायला सुप्रीम कोर्टाने तयारी दाखवली आहे.

समलिंगी संबंध हा गुन्हा आहे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निर्णयाला सुधारित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलंय. समलैंगिकांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या 'नाझ' फाउंडेशनने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. समलिंगी संबंध कायदेशीर ठरवणारा दिल्ली हायकोर्टाच निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द केला होता.

त्याविरोधात केंद्रानंही फेरविचार याचिका दाखल केली होती. पण, ती याचिकाही कोर्टाने फेटाळली होती. पण, आता 'नाझ' फाऊंडेशनची याचिका कोर्टाने दाखल करून घेतली. पण ही फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. समलिंगी संबंध बेकायदेशीर असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने डिसेंबरमध्ये दिला होता. पण, कोर्टाने ही याचिका फेटाळली. आता पुन्हा एकदा या सुधारित याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने तयारी दाखवली असल्यामुळे समलिंगी संबंधांसाठी लढणार्‍यांना दिलासा मिळालाय.

First published: April 22, 2014, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading