प्रवीण तोगडिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल

प्रवीण तोगडिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल

  • Share this:

pt_1354493g21 एप्रिल: हिंदू  नागरिक राहत असलेल्या भागातून मुस्लिम नागरिकाला बाहेर काढा, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'हिंदू भागात मुस्लिमांना मालमत्ता घेता येणार नाही, असा कायदा बनवण्यासाठी सरकारवर दबाव आणा. जर असं घडलं तर अशा मालमत्तांचा ताबा मिळवा आणि त्यावर बजरंग दलाचा बोर्ड लावा. आम्ही कोर्टात लढू. राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना अजून शिक्षा झालेली नाही. हा खटलाही तसाच रखडेल' असं वक्तव्या तोगडिया यांनी राजकोटमध्ये एका मुस्लिम उद्योजकाच्या घरा बाहेर केलेल्या निदर्शका दरम्यान केलं होतं.

राजकोटमध्ये एका मुस्लिम उद्योजकाने घेतलेल्या घराबाहेर करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये तोगडिया सहभागी होते. या घराचा ताबा घेऊन त्यावर बजरंग दलाचा फलक लावण्याचे आदेश तोगडियांनी निदर्शकांना दिल्याचं सांगण्यात येतं आहे. हे घर सोडण्यासाठी त्यांनी इथे राहणार्‍या मुस्लिम उद्योजकाला 48 तासांची मुदत दिल्याचे ही सांगितले जाते.

हिंदूबहुल वस्तीमध्ये मालमत्ता विकत घेणार्‍या मुस्लीम उद्योजकाविरोधात भडकाऊ भाषण केल्याबद्दल ही एफआयआर दाखल करण्यात आली. तोगडिया यांच्या विधानाची निवडणूक आयोगानं दखल घेतली आणि पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर कारवाई सुरू केली.

दरम्यान, आरएसएसनेही तोगडियांची पाठराखण केली आहे. तोगडीयांना आरोपी पिंजर्‍यात उभं करावं असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. ही बातमी फेरफार करून दाखवली गेली आहे. संघाचा कोणताही स्वयंसेवक अशा प्रकारे विचार करत नाही असंहीते म्हणाले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2014 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...