बेजबाबदार वक्तव्य करू नका - मोदी

  • Share this:

Image narendra_modi4_300x255.jpg22 एप्रिल :  निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या भाजपच्या नेत्यांना तंबी दिली आहे.

बेजबाबदार वक्तव्य करू नका अशी वक्तव्य मला मंजूर नाहीत. भाजपचे हितचिंतक असल्याचा दावा करणारे लोकांकडून अशी क्षुद्र वक्तव्य झाल्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरून प्रचार भरकटत आहे. अशी वक्तव्य करू नका, असं आवाहन मी करतो, असं मोदी यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे.

भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी मोदी विरोधकांना भारतात कोणतीही जागा नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यावरसुद्धा मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. या वक्तव्यावर कोणीच सहमत नसेल, असेही म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते गिरीराज सिंह आणि परवाच विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भडकाऊ वक्तव्यं केली होती. या दोघांनीही मुस्लिमविरोधी उद्गार काढले होते. यामुळे विरोधकही भाजपवर जोरदार हल्लाबोल करत  आहेत. प्रक्षोभक वक्तव्यं करणार्‍या नेत्यांवर मोदींनी कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली.

पाहूयात मोदींनी काय ट्विट केलंय ते...

भाजपचे हितचिंतक असल्याचा दावा करणारे जी क्षुद्र वक्तव्यं करताहेत, त्यामुळे विकास आणि उत्तम प्रशासनाच्या मुद्द्यापासून प्रचार भरकटत आहे. अशी कोणतीही बेजबाबदार विधानं मला मान्य नाहीत आणि अशी विधानं करू नयेत असं मी आवाहन करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2014 12:22 PM IST

ताज्या बातम्या