गोव्यात पुन्हा मायनिंग सुरू, कोर्टाने उठवली बंदी

गोव्यात पुन्हा मायनिंग सुरू, कोर्टाने उठवली बंदी

  • Share this:

56234_goa_mining21 एप्रिल : गोव्यातील मायनिंग उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने गोव्यातल्या मायनिंगवरची बंदी उठवली आहे. 2 कोटी टनापर्यंत लोहखनिज काढायला परवानगीही देण्यात आली आहे. 2012 पासून गोव्यात मायनिंगवर बंदी घालण्यात आली होती. ती आता उठवण्यात आलीय.

गोव्यातल्या मायनिंग प्रकरणी 2012 मध्ये न्यायाधीश शाह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने मायनिंगमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा ठपका ठेवला होता. या प्रकरणी गोव्याचे दोन माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि प्रतापसिंह राणे यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

2006 ते 2009 या पाच वर्षांत बेकायदा खाणकाम करण्यात आलं. या पाचवर्षांत खाण माफियांकडून तब्बल 35 हजार कोटींची लूट करण्यात आली. तब्बल 2,796 हेक्टरवर 59 खाणींचं अतिक्रमण करण्यात आलं तर 1,272 लाख 57 हजार 400 मेट्रिक टन लोहखनिजाचं अवैध उत्खननही करण्यात आलं असा अहवाल समितीने दिला होता. त्यामुळे गोव्यातील सर्व म्हणजे 90 खाणी सरकारच्या पुढच्या आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता सुप्रीम कोर्टाने यावरील बंद उठवली आहे त्यामुळे दोन वर्ष बंद पडलेल्या 90 खाणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

First published: April 21, 2014, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading