हिंदू वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा -तोगडिया

हिंदू वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा -तोगडिया

  • Share this:

34prveen_togadia_news21 एप्रिल : विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. राजकोटमध्ये हिंदू बहुल वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा. हिंदू भागात मुस्लिमांना मालमत्ता घेता येणार नाही, असा कायदा बनवण्यासाठी सरकारवर दबाव आणा. जर असं घडलं तर अशा मालमत्तांचा ताबा मिळवा आणि त्यावर बजरंग दलाचा बोर्ड लावा. यासाठी आम्ही कोर्टात लढू असं विधान तोगडियांनी केलंय.

राजकोटमध्ये एका मुस्लिम उद्योजकाने घेतलेल्या घराबाहेर करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये तोगडिया सहभागी झाले. या घराचा ताबा घेऊन त्यावर बजरंग दलाचा फलक लावण्याचे आदेश तोगडियांनी निदर्शकांना दिल्याचं सांगण्यात येतंय. हे घर सोडण्यासाठी त्यांनी इथं राहणार्‍या मुस्लिम उद्योजकाला 48 तासांची मुदत दिलीय.

मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तोगडियांची पाठराखण केलीय. तोगडियांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करावं असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. संघाचा कोणताही स्वयंसेवक अशा प्रकारे विचार करत नाही. ही बातमी फेरफार करून सांगितली असल्याचं संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी म्हटलंय. तर काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी तोगडिंयाच्या या वक्तव्यावर टीका केलीय आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केलीय.

First published: April 21, 2014, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading