देशभरात मतदानाची सरासरी वाढली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2014 11:02 PM IST

देशभरात मतदानाची सरासरी वाढली

national_voting17 एप्रिल :महाराष्ट्रासह देशभरातल्या 12 राज्यांतल्या 121 मतदारसंघांमध्ये आज (गुरुवारी) मतदान झालं. मतदानाच्या एकूण 9 टप्प्यांपैकी आजचा हा टप्पा महत्त्वाचा होता. काही ठिकाणी 70 टक्क्यांहून अधिक मतदान झालं.

 

तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, बिहार,जम्मू काश्मीर या सगळ्या राज्यांमध्ये 2009 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढलीय. कर्नाटकमध्ये सगळ्या मतदारसंघात आज मतदान झालं. कर्नाटकमध्येही 68 टक्के मतदानाची नोंद झालीय.

कर्नाटकमध्ये 5 पर्यंत सुमारे 56 टक्के मतदान झालं होतं. मात्र शेवटच्या एका तासात मतदानाची आकडेवारी वाढली. जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाची आकडेवारी 2009च्या तुलनेत तब्बल 24 टक्क्यांनी वाढलीय. झारखंडमध्ये मात्र मतदानाची टक्केवारी चांगलीच घटलीय. सचिन पायलट, सुशीलकुमार शिंदे, ज्योतिरादित्य सिंदिया, सुषमा स्वराज अशा एकूण 1 हजार 769 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशिन्समध्ये बंद झालं. छत्तीसगड, झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे मतदान शांततेत मतदान पार पडलं.

Loading...

तर झारखंडमध्ये मतदानावेळी माओवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 4 जवानांसह 5 जण जखमी झालेत. बोकारो जिल्ह्यातल्या लालपानिया या जंगल असलेल्या भागात माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणले. याशिवाय दानिया आणि बोकारोदरम्यान दरम्यान रेल्वे मार्गावरही माओवाद्यांनी आगी लावल्या.

 

------------------------------------------- -------------------------------------------

मतदारसंघ                 2014               2009

--------------------------------------------------------------------------------------

पश्चिम बंगाल                79                  80

उत्तर प्रदेश                       62                 55

राजस्थान                       63                 48

छत्तीसगड                       63                  58

ओडिशा                           70                 66

मध्य प्रदेश                     54                 46

बिहार                             56                  39

झारखंड                          26                  58

कर्नाटक                         68                  59

मणिपूर                         74                 77

-------------------------------------------------------------------------------------------

दरम्यान, दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी मतदान केलं. त्या मध्य प्रदेशातल्या विदिशामधून निवडणूक लढवत आहेत. मध्य प्रदेशातच ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही मतदानाचा हक्क बजावला. तर बिहारमध्ये 7 जागांवर मतदान होतंय. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी या माजी मुख्यमंत्र्यांच्या जोडीने पाटण्यामध्ये मतदान केलं. ही निवडणूक लालू प्रसाद यादव यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी रांचीमध्ये मतदान केलं. झारखंडमध्ये 6 जागांवर मतदान सुरू आहे. तिथे लोकसभेच्या 14 जागा आहेत.

रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी गुलबर्गामध्ये मतदान केलं. गेल्या निवडणुकीत ते इथून निवडून आले होते. आता त्यांच्यासमोर भाजपच्या रेवासिंग लोकू यांचं आव्हान आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मतदान केलं. बिहारमध्ये सत्ताधारी जेडीयूसमोर लोकसभा निवडणुकीत भाजपनं मोठं आवाहन उभं केलंय. तसंच काँग्रेस आणि आरजेडीची निवडणूकपूर्वी युती झाल्यानंही जेडीयू राज्यात काहीसे एकटे पडल्याचं दृश्य आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी बिहारमध्ये मतदान केलंय. मोदींच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही पाटण्यात मतदान केलंय.

तर दुसरीकडे जसवंत सिंह यांनी बारमेरमध्ये मतदान केलं. जसवंत सिंह यांची उमेदवारी यावेळी खूप गाजली. सिंह यांना भाजपकडून उमेदवारी हवी होती. पण ती त्यांना नाकारण्यात आली. शेवटी जसवंत यांनी आपण अपक्ष लढणार आहोत, अशी घोषणा केली. यामुळे त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबितही करण्यात आलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2014 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...