तृतीयपंथीयांना आता शिक्षण आणि नोकरीत आरक्षण !

तृतीयपंथीयांना आता शिक्षण आणि नोकरीत आरक्षण !

  • Share this:

transgenders new15 एप्रिल : समाजातील तृतीयपंथी अर्थात ट्रांसजेंडर्स यांना 'थर्ड जेंडर' म्हणून कायदेशीर ओळख देण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने आज (मंगळवारी) दिला.

तृतीयपंथीयांचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांत समावेश करून घेण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने आज केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे ट्रांसजेंडर्स यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

याबाबत अस्तित्व संस्थेची संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तृतीयपंथीयांना आता मागास समाज म्हणून विशेष वागणूक मिळेल.

तसेच त्यांना मागास समाज म्हणून विशेष वागणूक द्यावी, असे सांगत तृतीयपंथीयांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तृतीयपंथीयांना आता दत्तकही घेता येणार आहे.

First published: April 15, 2014, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading