प्रियंका गांधींनी वाराणसीतून लढण्याचं वृत्त फेटाळलं

प्रियंका गांधींनी वाराणसीतून लढण्याचं वृत्त फेटाळलं

  • Share this:

7e7f3f12-d61a-417b-bcab-3f9161dc64e2HiRes14 एप्रिल :   प्रियंका गांधी यांनी वाराणसीमधून मोदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या बातम्यांचं खंडन केलंय. मी कधीही वाराणसीमधून मोदींविरोधात लढण्याचा विचार केला नाही, तसंच काँग्रेससमोर तसा काही प्रस्तावही ठेवला नाही असं प्रियंका गांधी यांनी आयबीएन नेटवर्कला सांगितलं.

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रियंका गांधी निवडणूक ढण्यास उत्सुक होत्या, मात्र काँग्रेस नेतृत्वानं त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही अशी बातमी आज एका इंग्रजी वर्तमानपत्रानं छापली होती. पण या बातमीचं खंडण करत 'मी हे नेहमी म्हणाले आहे की अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर मी लक्ष केंदि्रत केलं आहे. निवडणूक लढवण्यापासून माझ्या परिवारातलेकोणीच मला अडवणार नाही. मी निवडणूक लढवावी असं मला वाटलं तर माझा भाऊ, आई आणि पती मला पाठिंबाच देतील. उलट मी तसं करावं असं माझा भाऊ नेहमी सांगतोही. पण हा पूर्णपणे माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि मी तो तेव्हाच बदलेन जेव्हा मला आतून तसं करावसं वाटेल.' अशी पुष्टीही प्रियंकानं जोडली.

वाराणसीत मोदीं विरुद्ध प्रियंका असा सामना झाला असता, तर तो कदाचित देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष म्हणून नोंदला गेला असता. पण, काँग्रेस हायकमांडने या प्रस्तावावर सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर त्यांना निवडणूक लढविण्यास विरोध केला. काँग्रेसने प्रियंका यांच्याऐवजी अजय राय यांना वाराणसीतून रिंगणात उतरविले आहे. सध्या प्रियंका आपला भाऊ राहुल आणि आई सोनिया गांधी यांच्या प्रचारात मग्न आहे.

First published: April 14, 2014, 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading