वरूण म्हणजे वाट चुकलेले 'गांधी' - प्रियंका गांधी

वरूण म्हणजे वाट चुकलेले 'गांधी' - प्रियंका गांधी

  • Share this:

Priyanka-Gandhi_013 एप्रिल :'वरुण गांधी हा माझा भाऊ असला तरी तो वाट चुकलेले 'गांधी' आहे. भाजप नेते वरुण गांधींनी चुकीचा मार्ग निवडला असून आता जनताच त्याला योग्य रस्त्यावर आणेल' अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी वरुण गांधींवर टीका केली आहे. तर 'देशाची सेवा करणे म्हणजे रस्ता भरकटणे असेल तर आता जनताच ठरवेल की कोण रस्ता भरकटला आहे' असं प्रत्युत्तर वरुण गांधींच्या आई मनेका गांधी यांनी दिले आहे.

उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर येथून निवडणूक लढवणार्‍या वरुण गांधींच्या विरोधात निवडणूक लढवणार्‍या काँग्रेसच्या उमेदवार अमिता सिंह यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत प्रियंका गांधींनी प्रथमच वरुण गांधींवर टीका केली. भाजप नेते वरुण गांधींनी चुकीचा मार्ग निवडला असून त्यांनी वेळीच योग्य मार्गावर आलं पाहिजे असं प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधींच्या टीकेवर वरुण गांधींच्या आई व भाजप नेत्या मनेका गांधी यांनी रविवारी सकाळी प्रत्युत्तर दिले आहे. कोण मार्गावरुन भरकटला हे आता जनताच ठरवेल असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वरुण गांधींनी राहुल गांधींच्या विकासकामांचे कौतुक केले होते. तर राहुल गांधींनीही त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. आता या नवीन वादावर गांधींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

First published: April 13, 2014, 2:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading