चुकीचं बोललो नाही, मुलायम सिंग विधानावर ठाम

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2014 06:34 PM IST

चुकीचं बोललो नाही, मुलायम सिंग विधानावर ठाम

45mulayam singh_news11 एप्रिल : 'मुलांकडून चुका होतच असतात, त्यांना थेट फाशीची शिक्षा देणं योग्य नाही" असं वादग्रस्त विधान करणारे सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी आपल्या विधानावरुन माघार घेण्यास नकार दिलाय.

समाजवादी पक्ष महिलांचा आदर करतो. आमच्या इतका आदर इतर कोणताही पक्ष करत नाही. आम्ही महिलांच्या अधिकारासाठी लढलोय. त्यांना सर्वअधिकार सपा सरकारने दिले आहे असं सांगत आपण आपल्या विधानावर ठाम असून त्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. विधानाचा विपर्यास केला गेलाय असं खापरचं त्यांनी माध्यमांवर फोडलं.

पण विधान मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका यादव यांनी घेतलीय. निवडणूक आयोगानेही याची दखल घेत यादव यांच्या भाषणाची सीडी मागवली आहे.

Loading...

गुरुवारी झालेल्या एका सभेत मुलायम सिंग यादव यांनी मुंबईतील शक्ती मिल गँगरेप प्रकरणी मुक्ताफळं उधळली. एवढंच नाही तर वारंवार बलात्काराचा गुन्हा करणार्‍यांची फाशीची शिक्षा समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास रद्द करू, असंही मुलायम सिंग म्हणाले. त्यांच्या या विधानाचा देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपने त्यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत सडकून टीका केलीय.

तर दुसरीकडे मुलायमसिंग यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजवादी पक्षाचेच आमदार अबू आझमी यांनीही एक वादग्रस्त विधान करून भरात भर टाकली. विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या महिलांनाही शिक्षा व्हायला हवी, अशा संबंधांना इस्लाममध्ये परवानगी नाहीय, त्यामुळे पुरूषासोबतच महिलेलाही शिक्षा झाली पाहिजे असे अकलेचे तारे आझमी यांनी तोडले. सपाच्या नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे चौफेर टीका होतं आहे पण आपल्या भूमिकेवर निगरगठ्ठपणे ठाम राहण्याचा पवित्रा सपाच्या नेत्यांनी घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2014 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...