कोणत्याही प्रकारे लैंगिक संबंध ठेवणार्‍या पुरुष आणि महिलेलाही शिक्षा द्यायला हवी -अबू आझमी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2014 06:01 PM IST

Image abu_azhami34_300x255.jpg11 एप्रिल :  इस्लामनुसार मुलाने किंवा मुलीने सहमतीने किंवा बळजबरीने विवाहबाह्य शारिरीक संबंध ठेवल्यास त्या दोघांनाही कडक शिक्षा झाली पाहिजे, त्या पीडितेलाही दोषी धरायला हवे असं निंदनीय विधान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केलं आहे.

विरोधकांवर टीका करताना राजकीय नेत्यांनी पातळी सोडणं ही आता नवी बाब राहिलेली नाही. मात्र, समाजासाठी महत्त्वाच्या असणार्‍या मुद्यांवर बोलतानाही त्यांची जीभ घसरायला लगली आहे.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी 'मुलं बलात्कार करतात, परंतु त्यांना फाशी द्यायला नको, या वयात अशा चुका होतात' असं वक्तव्य काल केले होतं. मुंबई शक्ती मिल बलात्काराच्या प्रकरणातल्या तीन दोषींना कोर्टानं फाशी सुनावली आहे. त्यावर त्यांनी ही प्रतक्रिया दिली. वारंवार बलात्काराचा गुन्हा करणार्‍यांची फाशीची शिक्षा समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास रद्द करू, असं मुलायम सिंह यांनी म्हटलं.

त्यांच्याचं पाठोपाठ आता आझमींनी उधळलेल्या या मुक्ताफळांमुळे त्यांच्यावर टिकेचा वर्षाव होत आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल सिन्नरमधल्या सभेत मुलायम सिंह यादव यांच्यावर जोरदार टीका केली.  'मुंबईत एका भगिनीवर बलात्कार होतो आणि याप्रकरणी 'बच्चोंसे ऐसी हरकते होती रहती है', असे निंदनीय वक्तव्य सिंह करतात आणि वरतून तो कायदा बदलून टाकण्याची भाषा करतात, असे सांगत सिंह यांच्या घरी आई-बहिणी आहेत की नाही? असा विचार मनात येतो तरी कसा,' असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Loading...

तर अबू आझमींची सून आणि अभिनेत्री आयेशा टाकिया हिनं अबु आझमींच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे... तिने म्हटलंय की मी माझ्या सासर्‍यांच्या वक्तव्याबद्दल जे वाचतेय ते खरं असेल तर मला आणि फरहानला त्या वक्तव्यामुळे धक्का बसला आहे. आम्ही अशा मनोवृत्तीचे नाही. हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारं आहे. अबू आझमींच्या वक्तव्यामुळे आम्हाला दुःख झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2014 12:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...