केरळमध्ये सर्वाधिक 74 तर दिल्लीत 64 टक्के मतदान

केरळमध्ये सर्वाधिक 74 तर दिल्लीत 64 टक्के मतदान

  • Share this:

454delhi_soniya_gandhi_voting10 एप्रिल : 16 व्या लोकसभेसाठी आज तिसर्‍या टप्प्यासाठी देशभरातल्या 11 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण 91 मतदारसंघांमध्ये आज (गुरुवारी) शांतेत मतदान पार पडलं. जवळपास सर्वच ठिकाणी 2009च्या तुलनेत जास्त मतदान झालंय. आजच्या तिसर्‍या टप्प्यात सर्वाधिक मतदान झाल्याचा बहुमान केरळला मिळाला. केरळमध्ये 74 टक्के मतदान झालंय.

त्यापाठोपाठ हरियाणामध्ये 70, दिल्लीत 64, मुझफ्फरनगरमध्ये 69, बिहारमध्ये 55, मध्य प्रदेशात 56 टक्के मतदान झालं. यात पहिल्यांदा मतदान करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. नवी दिल्ली, चंदिगड, हरियाणा, यूपी या काही महत्त्वाच्या राज्यांसह नक्षलप्रभावित भागांमध्येही मतदान झालंय.

यूपीतल्या दंगलग्रस्त भागातल्या 10 मतादरसंघांचाही यात समावेश आहे. नक्षलग्रस्त भागांमध्ये नक्षलवाद्यांनी काही ठिकाणी मतदान पथकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी इव्हीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे प्रयत्न चोख पोलीस बंदोबस्तामुळे हाणून पाडण्यात आले. नक्षलप्रभावित छत्तीसगडमधल्या बस्तरमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त करण्यात आलं. किरकोळ घटना वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झालंय.

2009 आणि आजच्या मतदानातील तफावत

दिल्लीत 64 टक्के मतदान झालंय. हरियाणामध्ये गेल्या वेळी 67 टक्के मतदान झालं होतं. यावेळी तिथे 70 टक्के मतदान झालंय. मुझफ्फरनगरमध्ये 69 टक्के मतदान झालं. गेल्या वेळी इथे 54 टक्के मतदान झालं होतं. तर संपूर्ण उत्तर प्रदेशात 65 टक्के मतदान झालंय. छत्तीसगडमधल्या अतिशय संवेदनशील आणि नक्षलप्रभावित बस्तरमध्ये 51 टक्के मतदान झालं. इथेही गेल्या वेळी फक्त 47 टक्के मतदान झालं होतं. बिहारमध्ये 55 टक्के मतदान झालं. 2009 साली तिथे 42 टक्के मतदान झालं होतं. जम्मूत 66 टक्के, अंदमान-निकोबारमध्ये 67 टक्के, ओडिशामध्ये 67 टक्के आणि मध्य प्रदेशात 56 टक्के मतदान झालंय. आजच्या तिसर्‍या टप्प्यात सर्वाधिक मतदान केरळात झालंय. तिथे 74 टक्के मतदान झालंय.

दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

सामान्य जनतेबरोबरच मोठ्या नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. सकाळी साडे नऊच्या सुमाराला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निर्माण भवनमध्ये आपलं मत टाकलं. तिथे मतदारांची रागं होती. सोनिया यांनी रांगेत उभं राहून मतदान केलं. हा भाग नवी दिल्ली मतदारसंघात येतो. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीं यांनीही नवी दिल्लीतल्या औरंगजेब लेन या मतदान केंद्रवर मतदान केलं. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनीही सकाळीच मतदान केलं. नवी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या नेत्यांनी मतदान केलं. दिल्लीमधल्या चांदणी चौक या मतदारसंघातल्या तिरंगी लढतीनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. काँग्रेसचे उमेदवार कपिल सिब्बल, भाजपचे उमेदवार हर्ष वर्धन आणि आम आदमी पक्षाचे आशुतोष यांनी मतदान केलं.

तर दुसरीकडे चंदिगड या मतदारसंघाकडेही सार्‍या देशाचं लक्ष लागलंय. कारण इथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल, भाजपकडून अभिनेत्री किरण खेर आणि आम आदमी पक्षाकडून अभिनेत्री गुल पनाग अशी लढत होतेय. अशी रंगतदार लढत असल्यामुळेच कदाचित यावेळी चंदिगडमध्ये 72 टक्के असं विक्रमी मतदान झालंय. यापूर्वी एवढं मतदान चंदिगडमध्ये झालेलं नाही. संपूर्ण उत्तर प्रदेशातल्या 11 जिल्ह्यातल्या 10 लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान झालंय. यात सात महिन्यांपूर्वी दंगल उसळलेल्या मुझफ्फरनगरचाही समावेश आहे. मुझफ्फरनगरमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत मतदान केलं. दिवसभर मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. त्यात तरूण आणि महिलांचा मोठा सहभाग होता.

First published: April 10, 2014, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading