लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्पातील मतदानाला सुरुवात

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्पातील मतदानाला सुरुवात

  • Share this:

election voting10 एप्रिल :  मतदानाचा आज तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा आहे.महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशासह एकूण 91 जागी मतदान होत आहे.

आज महाराष्ट्रासह देशातल्या एकूण 11 राज्यांत आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 91 जागांसाठी मतदान आहेत. महाराष्ट्राबाहेर एकूण 81 जागांवर हे मतदान होतंय. मतदानाचा हा तिसरा टप्पा आहे. या टप्प्यात काही मतदारसंघ हे अत्यंत संवेदनशील मतदारसंघ आहेत. ज्यामध्ये जम्मू काश्मीरमधील जम्मू ह्या लोकसभा मतदारसंघात, बिहारमधल्या औरंगाबाद आणि जमौई या दोन नक्षलग्रस्त मतदारसंघांत, झारखंडमधल्या पलामू आणि छत्तीसगडमधल्या बस्तर या नक्षलग्रस्त भागात आणि उत्तरप्रदेशमधल्या मुझफ्फरनगर ह्या काही काळापूर्वी दंगल झालेल्या भागात मतदान होतंय. शिवाय, केरळ, दिल्ली आणि हरयाणा या तीन राज्यांच्या सगळ्या मतदारसंघांसाठी मतदान होतंय.

एक नजर टाकूया विदर्भ वगळता कोणत्या राज्यात किती मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होईल.

राज्य - मतदासंघ

केरळ - 20

उत्तर प्रदेश - 10

ओडिशा - 10

हरियाणा - 10

मध्य प्रदेश - 9

दिल्ली - 7

बिहार - 6

चंदिगड - 1

छत्तीसगड - 1

जम्मू आणि काश्मीर - 1

झारखंड - 4

लक्षद्वीप - 1

अंदमान आणि निकोबार - 1

एकूण - 81

केरळ

1) तिरुअनंतपूरम मतदारसंघ

काँग्रेसचे शशी थरूर विरुद्ध भाजपचे ओ. राजगोपाल

2) एर्नाकुलम मतदारसंघ

काँग्रेसचे के. व्ही. थॉमस विरुद्ध डावे समर्थित अपक्ष ख्रिस्ती फर्नांडिस

महत्त्वाच्या लढती

दिल्ली

1) पूर्व दिल्ली मतदारसंघ

काँग्रेसचे संदीप दीक्षित विरुद्ध आम आदमी पक्षाचे राजमोहन गांधी

2) नवी दिल्ली मतदारसंघ

काँग्रेसचे अजय माकन विरुद्ध भाजपच्या मीनाक्षी लेखी

3) चांदनी चौक मतदारसंघ

काँग्रेसचे कपिल सिब्बल विरुद्ध भाजपचे हर्षवर्धन विरुद्ध आम आदमी पक्षाचे आशुतोष

 चंदिगड

काँग्रेसचे पवन कुमार बन्सल विरुद्ध भाजपच्या किरण खेर विरुद्ध आम आदमी पक्षाच्या गुल पनाग

हरियाणा

1) गुडगाव मतदारसंघ

भाजपचे राव इंदरजीत सिंग विरुद्ध आपचे योगेंद्र यादव

2) रोहतक मतदारसंघ

काँग्रेसचे दीपेंदर हुड्डा विरुद्ध भाजपचे ओमप्रकाश धांखड विरुद्ध आम आदमी पक्षाचे नवीन जयहिंद

3) कुरूक्षेत्र मतदारसंघ

काँग्रेसचे नवीन जिंदाल विरुद्ध भाजपचे राजकुमार सैनी विरुद्ध आपचे बलविंदर कौर

मध्य प्रदेश

छिंदवाडा मतदारसंघ

काँग्रेसचे कमल नाथ विरुद्ध भाजपचे चौधरी चंद्रभान सिंह

उत्तर प्रदेश

1) बिजनौर मतदारसंघ

राष्ट्रीय लोकदलाच्या जयाप्रदा विरुद्ध भाजपचे भारतेंदू सिंह विरुद्ध बसपाचे मलूक नागर विरुद्ध सपाचे शाहनवाझ राणा

2) मेरठ मतदारसंघ

काँग्रेसच्या नगमा विरुद्ध भाजपचे राजेश अगरवाल विरुद्ध समाजवादी पक्षाचे शाहीद मंझूर

3) भागपत मतदारसंघ

आरएलडीचे अजित सिंह विरुद्ध भाजपचे सत्यपाल सिंह विरुद्ध बसपाचे प्रशांत चौधरी विरुद्ध सपाचे गुलाम मोहम्मद

4) गाझियाबाद मतदारसंघ

काँग्रेसचे राज बब्बर विरुद्ध भाजपचे व्ही. के. सिंग विरुद्ध आपच्या शाझिया इल्मी

First published: April 10, 2014, 8:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading