वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय रिंगणात

वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय रिंगणात

  • Share this:

aji rai08 एप्रिल : देशाचे लक्ष्य लागलेल्या वाराणसीच्या लोकसभा निवडणुकीत अखेर काँग्रेसने आपला उमेदवार उतरवला आहे. वाराणसीतून काँग्रेसने स्थानिक नेते अजय राय यांना उमेदवारी देण्यात आलीय.

अजय राय हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरूध्द लोकसभा निवडणूक लढवणार आहे. अजय राय यांना भूमिहार-ब्राम्हण समाजाचा पाठिंबा आहे असं मानलं जातं.

राय यांनी याआधी पाचवेळा आमदारपद भूषवलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी दोनवेळा पक्षही बदला आहेत. काँग्रेसतर्फे दिग्विजय सिंह व रशीद अल्वींनी याआधी वाराणसीमधून लढण्याची तयारी दाखवली होती. पण आता राय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.

First published: April 8, 2014, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading