केजरीवालांना पुन्हा लगावली थप्पड

केजरीवालांना पुन्हा लगावली थप्पड

  • Share this:

M_Id_463433_Arvind08 एप्रिल : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा हल्ला करण्यात आला. सुलतानपुरीत केजरीवाल यांच्या प्रचार करत असताना अज्ञात व्यक्तीने केजरीवालांना थप्पड लगावली. गळ्यात हार घालण्याच्या निमित्ताने ही व्यक्ती केजरीवाल यांच्या जवळ गेली आणि त्याने केजरीवाल यांना थप्पड लगावली. या व्यक्तीने केजरीवाल यांना थप्पड लगावल्यावर एकच गदारोळ झाला. आपच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी या व्यक्तीची चौकशी केली असता हा व्यक्ती ऑटोरिक्षावाला असल्याचं सांगण्यात आलंय. केजरीवाल यांनी ऑटो रिक्षावाल्यांना धोका दिला असा आरोप या ऑटोरिक्षा वाल्याने केलाय. आठ दिवसांतला केजरीवाल यांच्यावरचा हा दुसरा हल्ला आहे. दक्षिण दिल्लीतल्या रोड शो दरम्यानही केजरीवाल यांच्यावर अशाचप्रकारे हल्ला झाला होता.

या हल्ल्यावर अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवरुन ताबडतोब प्रतिक्रिया दिली. "मी हाच विचार करतोय की माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ले का होतायेत ?, या हल्ल्यांमागचा सूत्रधार कोण आहे ? त्यांना हवंय तरी काय ?अशा हल्ल्यातून मिळतंय तरी काय ? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. तर आपचे नेते आशुतोष यांनी भाजपवर आरोप केलाय. केजरीवाल यांच्या हल्ल्यामागे भाजपच हात असल्याचा आरोप आशुतोष यांनी केला. केजरीवाल यांच्यावरच्या हल्ल्यामागे बड्या नेत्यांचा हात असून याची चौकशी व्हावी अशी मागणीही आशुतोष यांनी केलीय.केजरीवालांवरचे हल्ले

- 5 मार्च: कच्छ, गुजरात - गाडीवर हल्ला

- 25 मार्च: वाराणसी - रॅलीत भाषणादरम्यान अंडी आणि शाई फेकून हल्ला

- 28 मार्च: चर्खी दादरी, हरियाणा - रोड शोदरम्यान मानेवर हल्ला

- 4 एप्रिल: दक्षिण दिल्ली - रोड शोदरम्यान माजी कार्यकर्त्यानं थप्पड लगावली

First published: April 8, 2014, 2:01 PM IST

ताज्या बातम्या