Elec-widget

आयपीएलच्या निर्णयाबाबत बीसीसीआयने चर्चा केली नाही - गृहमंत्रालयाचा खुलासा

23 मार्च इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलचे सामने भारताबहेर न खेळवण्याचा निर्णयावर गृहमंत्रलयाने जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गृह मंत्रालयाला विश्वासात न घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचं गृहमंत्री पी.चिदंबरम् यांनी म्हटलं आहे. आता थोड्याच वेळात दिल्लीत आयपीएच्या सामन्यांबाबतची एक प्रेस कॉन्फरन्स अपेक्षित आहे. रविवारी आयपीएल भारताबाहेर खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला. आणि आज फ्रँचाईजींनीही हा निर्णय उचलून धरला आहे. आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये आयपीएलचं नवं ठिकाण जाहीर होण्याची शक्यता आहे. पण गृहमंत्रालयाच्या या प्रतिक्रियेमुळे आयपीएलचे सामने नेमके कुठे होणार आहेत, याबाबतचं प्रश्नचिन्ह कायम आहे.बीसीसीआयची रविवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत आयपीएल भारताबाहेर हलवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बैठकीनंतर घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये याविषयी घोषणा केली. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डांशी आयोजनाविषयी बोलणी सुरू आहेत, असं मनोहर म्हणाले. आयपीएलचं वेळापत्रक आधी ठरल्याप्रमाणे असेल. आणि वेळाही भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे संध्याकाळी चार आणि आठ वाजता असतील. असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश सरकारांनी आयोजनाला नकार दिल्यामुळे स्पर्धा भारताबाहेर हलवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असंही मनोहर यांनी म्हटलं आहे. आयपीएल देशाबाहेर हलवण्याचा निर्णय हा आर्थिक नफा तोट्याचा विचार करून घेतलेला नाही तर क्रिकेटच्या भल्यासाठी हा निर्णय घेतलाय असं आयपीएलचे संचालक ललित मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2009 07:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com