24 तासांत आरोप सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या - साबीर अली

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2014 05:46 PM IST

24 तासांत आरोप सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या - साबीर अली

sabir ali30 मार्च :  इंडियन मुजाहिदीनचा मास्टरमाईंड यासिन भटकळ याच्याशी माझा संबंध जोडणारे भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी येत्या 24 तासात माझे यासीन भटकळ यांच्याशी संबंध असल्याचं सिद्ध करावं नाहीतर राजीनामा द्यावा,' असं आव्हान जदयू नेते साबीर अली यांनी केलं आहे.

'माझा भटकळशी कसलाही संबंध नसून साध्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं चुकीचं आहे' असं साविर अलींनी आज पत्रकारांशा बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'मुख्तार अब्बास नक्वींचे आरोप खरे ठरले तर मला भर चोकात फाशी द्या असं अव्हान केलं आहे. तसंच त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप निराधार आहे' असंही साबिर अलींनी म्हटलं आहे. तसेच आपण नक्वी यांना कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याचेही साबीर अली यांनी सांगितलं आहे. साबीर अली यांचे भटकळशी संबंध असल्याचे वक्तव्य नक्वी यांनी केल्यानंतर भाजपने त्यांचे सभासदत्व रद्द केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2014 05:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...