मोदींना धमकी देणार्‍या काँग्रेसच्या उमेदवाराला अटक

मोदींना धमकी देणार्‍या काँग्रेसच्या उमेदवाराला अटक

  • Share this:

346_imran masood29 मार्च : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या खांडोळी करू अशी धमकी देणारे काँग्रसचे सहारनपूरमधील उमेदवार इम्रान मसूदना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमाराला त्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सहारनपूरच्या देवबंद पोलीस स्टेशमध्ये ठेवण्यात आलयं. इम्रान मसूदनी नरेंद्र मोदींवर अत्यंत प्रक्षोभक भाषेत टीका करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

नरेंद्र मोदींचे तुकडे तुकडे करुन टाकू अशी धमकीच मसूद यांनी दिली होती. याबाबतचा व्हिडिओ लिंक झाल्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला. मसूद यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून बरीच टीका झाली.

भाजपच्या नेत्यांसह काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर राहुल गांधी यांनी सहारनपूरमधली आपली आजची सभा रद्द केलीय.

First published: March 29, 2014, 3:16 PM IST

ताज्या बातम्या