'आपकी आवाज हमारा संकल्प',काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध

'आपकी आवाज हमारा संकल्प',काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध

  • Share this:

congress manifesto 201426 मार्च : 'आपकी आवाज हमारा संकल्प' अशी घोषणा करत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केलाय. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी सर्वांनी सर्वसमावेश विकासाचं आश्वासन दिलं.

घोषणापत्रात सर्वच घटकांचा समावेश असल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं. तर पंतप्रधानांनी विकासाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे दावे खोडून काढले.

काँग्रेसचं विकासाचं मॉडेल गुजरात मॉडेलपेक्षा वेगळं आहे, काँग्रेसचे मॉडेल सर्वसमावेशक आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. तर लोकांच्या भाव भावनांचं प्रतिबिंब या घोषणापत्रात आहे, असं राहुल गांधी म्हणाले. हा जाहिरनामा तयार करण्यासाठी राहुल गांधी यांनी देशभर फिरून, निरनिराळ्या सामाजिक, वैचारिक गटांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली होती.

First published: March 26, 2014, 3:12 PM IST

ताज्या बातम्या